शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘मैत्र’ने वाचविले चितळाचे प्राण

By admin | Updated: January 30, 2016 00:42 IST

मंगळवारी वॉर्ड जवळील गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या चितळाला पाण्याबाहेर जिवंत काढून प्राण वाचविले. ही घटना आज दुपारी १२ वाजताचे दरम्यान घडली.

पवनी : मंगळवारी वॉर्ड जवळील गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या चितळाला पाण्याबाहेर जिवंत काढून प्राण वाचविले. ही घटना आज दुपारी १२ वाजताचे दरम्यान घडली. मोकाट कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे कालव्यात पडलेल्या चितळाला मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ढिवर बांधवाच्या मदतीने नहरातून बाहेर काढून त्या चितळाचे प्राण वाचविले. गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात चितळ पडल्याची माहिती मैत्रच्या पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे होताच मैत्रचे सचिव माधव वैद्य, महादेव शिवरकर व अन्य सदस्यांनी घटनास्थळ गाठले. वनविभागाचे क्षेत्रसहायक पी. एम. कांबळे, वनमजूर आर. एम. कुर्झेकर, हरीशचंद्र मुंडले व ढिवर बांधव यांच्या मदतीने कालव्यात पडलेल्या चितळाला बाहेर काढून धानोरी बिटातील कक्ष क्रमांक ३०७ येथे सोडून जिवनदान दिले.मैत्रनी यापूर्वीही अनेक प्राण्यांना जिवनदान दिले असून मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहूसंस्था ही वन्यजीवांच्या संरक्षणाकरिता काम करीत असून वन्यजीवांचे संरक्षणाकरिता नेहमीच तत्परतेने कार्य करीत असते. कालव्यात पडलेल्या चितळाला पाण्याचे बाहेर काढण्याकरिता सदस्य संघरत्न धारगावे, राहूल वाघमारे, प्रफुल रामटेके, अंकित बानाईत, अमोल बानाईत, वनविभागाचे धानोरी बिटाचे क्षेत्रसहायक पी. एम. कांबळे, वनमजूर आर. एम. कुर्झेकर, हरिशचंद्र मुंडले व ढिवर बांधव यांनी सहकार्य केले. मैत्रच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (शहर प्रतिनिधी)