शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

बाजार समितीच्या आमसभेत खुर्च्यांची फेकाफेक

By admin | Updated: August 12, 2014 23:35 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरची आमसभा दुपारी २ वाजता सुरू होताच सभासदांनी, सभापतींचा विरोधात गोंधळ घातला. आमासभेत काहींचा सत्कार समारंभासाठी ३ तासांचा अवधी लागतात.

तुमसरातील प्रकार : लवकरच गुंडाळली आमसभातुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरची आमसभा दुपारी २ वाजता सुरू होताच सभासदांनी, सभापतींचा विरोधात गोंधळ घातला. आमासभेत काहींचा सत्कार समारंभासाठी ३ तासांचा अवधी लागतात. सभासद ओरडल्यामुळे आमसभा गुंडाळण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केला. संतापलेल्या सभासदांनी खुर्च्याची फेकाफेक करताच प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी संपूर्ण संचालक मंडळाने अध्यक्षासह आमसभेतून पळ काढला.तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक नावाजलेली बाजार समिती म्हणून ओळखली जाते. परंतु वर्तमान अध्यक्ष व संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीमुळे ही बाजार समिती या दोन व्यक्तीवर अवलंबून आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीची दुपारी २ वाजता आमसभा सुरू झाली. आमसभेत सत्कारासाठी अवधी लागल्यामुळे सभासद संतापून, आपला राग खुर्च्या फेकून व्यक्त केला. आमसभेत अध्यस्थानी सभापती भाऊराव तुमसरे यांनी अहवाल वाचताच बसलेल्या सभासदांना पश्नांचा भडीमार करताच सभापती उत्तर देऊ शकले नाही व उस्रे देण्यास उपसभापती राजकुमार माटे उभे होताच सभासद उत्तरे द्यावी, अशी मागणी करतात हळूहळॅ सर्व संचालक मंडळ व्यासपीठ सोडून जाऊ लागले. आमसभेत संचालक मंडळांनी आमसभा गुंडाळण्याला प्रयत्न करत, असताना काही सभासदांनी बाजार समितीत, रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचानी न करता, नव्याने कर्मचारी भरती असा प्रश्न विचारताच सभापती तुमसरे उत्तरे देऊ शकले नाहीत. सभासदांनी आमसभेत विविध प्रश्न उपस्थित करून अध्यक्षांना घेरण्याचा प्रयत्न करताच संचालकांनी पळ काढल्यामुळे आमसभेत एकच गोंधळ उडाला. आमसभेचे अहवाल व निमंत्रण पत्रिका सुद्धा सभासदांना देण्यात आले नसल्याने त्यांच्यात रोष होता. सभापती व संचालक मंडळ आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थीत पार पाडत नसून स्वत:च्या हितासाठी बाजार समिती चालवित असल्याचा आरोप काही सभासदांनी केला. ही बाजारपेठ घोटाळेबाज बाजारपेठ म्हणून ओळखली जात असल्याचा आरोपही उपस्थित सभासदांनी केला. त्यामुळे आमसभा वादग्रस्त ठरली.(तालुका प्रतिनिधी)