शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राईबची आढावा बैठक

By admin | Updated: March 18, 2015 00:49 IST

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या दालनात खाते व कार्यालयीन प्रमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ ....

भंडारा : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या दालनात खाते व कार्यालयीन प्रमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ भंडाराच्या पदाधिकारी व शिष्टमंडळाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध अन्यायग्रस्त प्रश्नांवर समाधानकारक चर्चा होवून काही प्रश्नाचा तात्काळ निपटाराही करण्यात येवून काही समस्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी व निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदींच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. प्रमुख मुद्यांमध्ये नगर परिषद भंडारा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांचे पद रोस्टरनुसार न भरणे, नगर परिषदेमधील वर्ग ३ व ४ च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ५ व ६ व्या वेतन आयोगाची थक बाकी न देणे, नगर परिषद भंडारा येथील वर्ग क व ड ची अनुकंपातत्वावरील रिक्त पदे न भरणे, तसेच जिल्हा परिषद भंडारा मधील २४ वर्ष सलग सेवा झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना शासकीय परिपत्रक असूनही त्याला केराची टोपली दाखवून त्यांची निवड श्रेणी मंजूर न करणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नियमानुसार अनुसूचित जातीचे रिक्त पदला जातीतून न भरता विशेष मागासवर्गीय संवर्गातून भरणे, संघटनेच्या दैनंदिन कामकाज व कार्यालयीन कामकाजाकरीता सामाजिक न्याय भवनातील एक कक्ष उपलब्ध करून देणे, समता नगर भंडारा वसाहतील मोबाईल टावरच्या उभारणीस तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे सर्व नागरिकांनी लेखी विरोध दर्शवूनही न.प. ने टॉवर उभारणीस ना हरकत प्रमाणपत्र देणे.या शिष्टमंडळाचे नेतृत्व अमृत बन्सोड, जिल्हाध्यक्ष गुलशन गजभिये, नरेंद्र बन्सोड, इंजि. रूपचंद रामटेके, वासुदेव नेवारे यांनी केले. (प्रतिनिधी)