शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

कॅशलेस व्यवहारासाठी प्रशिक्षण

By admin | Updated: January 5, 2017 00:37 IST

८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटबंदी केल्यानंतर रोखरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी ...

अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा : ग्रामीण भागातही कार्यशाळेचे आयोजन भंडारा : ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटबंदी केल्यानंतर रोखरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांना कॅशलेश व्यवहार अवगत व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. मंगळवारला सामाजिक न्याय भवन येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करुन रोखरहित व्यवहाराची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत रोखरहित व्यवहार कसे करावे ही बाब सादरीकरणाच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आली. आपले सरकार सेवा केंद्राच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने डिजीटल पेमेंट, युपीआय, बँक कार्ड, पॉईंट आॅफ सेल मशीन, ई-बटवा व आधारकार्ड एनेबल पेमेंट याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे पेमेंट आता कॅशलेश पध्दतीने करण्याचा शासनाचा आदेश आहे. या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांना रोखरहित व्यवहाराचे ज्ञान व्हावे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने या कार्यशाळा अयोजित करण्यात येत आहेत. कॅशलेश होतांना नागरिक आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार पाच सोप्या पध्दतीने करु शकतात. यासाठी आपला मोबाईल आपला बटवा होणार आहे. यात युपीआय युएसएसडी पध्दती, ई-वॉलेट, बँक कार्डस व पॉर्इंट आॅफ सेल मशिन आणि आधार एनेबल पेमेंट पध्दतीचा समावेश आहे. या सर्व पध्दती या कार्यशाळेत सादरीकरणासह समजावून सांगण्यात आल्या. कॅशलेश महाराष्ट्रासाठी व नागरिकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील गावागावात असे प्रशिक्षण देण्याचा जिल्हाधिकारी यांचा मानस आहे. या कार्यशाळेत आपले सरकार सेवा केंद्राचे प्रशिक्षक हरिचंद्र पौनीकर व नंदकिशोर उरकुडे यांनी साध्या व सोप्या भाषेत सादरीकरणाद्वारे कॅशलेश व्यवहाराच्या पाचही मुद्दयांची माहिती दिली. पहिल्या तीन मुद्दयाबाबत म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस(वढक), ई-वॉलेट, कार्ड्स, पीओएस, स्मार्ट मोबाईल व इंटरनेट सुविधा आवश्यक असून उर्वरित दोन मुद्दयाबाबत म्हणजेच आधार सक्षम पेमेंट सिस्टीम(अएढर), अविस्तृत पूरक सेवा माहिती (यूएसएसडी) स्मार्ट मोबाईल व इंटरनेटची आवश्यकता नसल्याचे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. या वेळी प्रशिक्षकांनी सांगितले की, कार्यशाळेत असलेल्या प्रत्येकांनी ही माहिती आपल्या परिवारास, मित्रास तसेच इतरांना द्यावी व कॅशलेश व्यवहाराविषयी जनजागृती करावी. कार्यशाळा संपल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक आत्मविश्वास वाटत होता की आपणास कॅशलेश व्यवहाराची माहिती फार महत्वाची आहे आणि ती मी इतरांना सांगणार. या कार्यशाळेत अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)