शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बसेस बंद असल्याने मजुरांचा पुन्हा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST

रावणवाडी : मार्च महिन्यापासून पुन्हा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसेसला राज्यात प्रवेशबंदी ...

रावणवाडी : मार्च महिन्यापासून पुन्हा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसेसला राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेलेल्या मजुरांना गोंदिया येथून बसेस बंद असल्याने पायीच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

मागील आठवडाभरापासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून असल्याने गोंदिया येथे रेल्वेगाड्याने येणारे मजूर पायीच मध्य प्रदेशात जात आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या सीमेवरील रजेगावजवळ मोठ्या प्रमाणात पायी जाणाऱ्या मजुरांचे जत्थे दिसून येत आहेत. मध्य प्रदेशातील मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद, नागपूर या शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. होळी सणानिमित्त सध्या ते आपल्या गावाला जात आहेत, पण बससेवा बंद असल्याने ते पायीच आपले गाव गाठत आहेत. मागीलवर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने त्यांना पायीच आपले गाव गाठावे लागले होते. तेव्हादेखील हजारो किमीचा प्रवास करुन मजूरवर्ग आपल्या गावी परतला होता. तीच स्थिती यंदा बसेस बंद असल्याने पुन्हा निर्माण झाली आहे.

खासगी वाहनांचे दर चारपट

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून या रेल्वेस्थानकावर दररोज मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील मजूर परतत आहेत. मात्र, त्यांना आपल्या गावी परत जाण्यासाठी बसेसची सोय नसल्याने खासगी वाहने भाड्याने घेऊन ते गावी परतत आहेत. मात्र, या संधीचा फायदा खासगी वाहनचालक घेत त्यांच्याकडून चारपट वाहनेभाडे घेत असल्याचे चित्र आहे.

रजेगाव सीमेपर्यंत सोडण्यासाठी २०० रुपये भाडे

गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेशाची सीमा लागून आहे. रजेगावनंतर मध्य प्रदेशची सीमा सुरू होत असल्याने तिथपर्यंत सोडून देण्यासाठी ऑटोचालक प्रवाशांकडून प्रतिव्यक्ती दोनशे रुपये भाडे घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रवाशांना भूर्दंड बसत आहे.