शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

बनावट अंदाजपत्रकावर बांधले ‘वनतलाव’!

By admin | Updated: February 16, 2016 00:41 IST

मोहाडी तालुक्यातील जामकांद्री वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवनी येथे चार वनतलावांचे बांधकाम करण्यात आले.

मोहाडी तालुक्यातील शिवणी येथील प्रकार : बांधकामावरील मातीमिश्रीत मुरूमाची विक्रीप्रशांत देसाई भंडारामोहाडी तालुक्यातील जामकांद्री वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवनी येथे चार वनतलावांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, हे बांधकाम बनावट अंदाजपत्रकावर करण्यात आले आहे. या वनतलावातून निघालेल्या मातीमिश्रीत मुरूमाचीही परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी वनविभागाच्यावतीने जंगलात वनतलावांची निर्मिती करण्यात येते. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र जाम कांद्रीच्या सहवनक्षेत्र आंधळगांव अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती शिवनीच्या माध्यमातून शिवनी येथे चार ठिकाणी पाणी साठवण तलावांचे बांधकाम करण्यात आले. या बांधकामाला प्रशासनाने १८ मार्च २०१५ ला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. २०१४-१५ चे मंजूर कामे सुरू असून काही कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, बांधकाम करण्यात आलेल्या वनतलावांच्या मंजुरीसाठी बनावट अंदाजपत्रक दाखविण्यात आले आहे. हिवरा बिटाच्या वनतलावाच्या अंदाजपत्रकावर ‘नोटशिट’ लावून त्या अंदाजपत्रकाला मंजुरी प्राप्त करून घेण्यात आलेली आहे. बनावट अंदाजपत्रकावर वनविभागाने शिवणी येथील चार वन तलावालापैकी दोन तलावांना प्रत्येकी २ लाख ९३ हजार ३०० तर दोन तलावांना प्रत्येकी २ लाख ९३ हजार ४०० रूपये मंजूर करण्यात आले. बनावट अंदाजपत्रकावर चारही वनतलावाचे बांधकाम सुरू असून या बांधकामात अनियमितता आहे. तलावाचे बांधकाम खोलगट भागात व्हायला पाहिजे, मात्र, बांधण्यात आलेले तलाव हे उंच भागावर बांधण्यात आलेले आहे. याशिवाय वनतलाव बांधकामातून निघालेला मातीमिश्रीत मुरूम नियमानुसार बाहेर नेणे किंवा विक्री न करणे, असा नियम असताना या कामावरील मातीमिश्रीत परस्पर विकण्यात आला आहे.५०० ट्रॅक्टर मुरूमाची नियमबाह्य विक्रीवनविभागाच्या हद्दीतील साहित्य त्यांच्या परवानगीविना इतरत्र हलविता येत नाही. तलावाच्या बांधकामावरील मातीमिश्रित मुरूमाची वनाधिकाऱ्यांनी परस्पर विक्री केली आहे. चारही कामावरील सुमारे ५०० ट्रॅक्टर मुरूम लगतच्या गावातील ग्रामपंचायतीने तर काही नागरिकांनी विकत घेतला आहे. बांधकामात अनियमितताचारही वनतलाव १०० बाय १०० आकाराचे बांधावयाचे आहेत. हे तलाव उतार भागात बांधणे गरजेचे असून यामुळे तलावात पावसाळ्यात पाणी जमा होण्यास मदत होईल. या तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी ‘इनपूट आऊटपूट’ बांधण्यात आले नाही. उंचीवर बांधकाम करण्यात आल्याने पाणी साठवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बांधकाम यांत्रिक साहित्यातूनवनतलावाची कामे वन व्यवस्थापन समितीच्या पंजीकृत समितीचे सभासदाकडून करून घेण्याचे निर्देश उपवनसंरक्षकांनी दिले आहेत. मात्र, या निर्देशाचे पालन न करता तलावाचे काम जेसीबीच्या मदतीने करण्यात आले. तलावाचे दगडाने पिचिंग करणे व पायऱ्या बांधणे गरजेचे आहे. परंतु दगडाचा वापर न करताच तलावात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे येथे पाणी पिण्यासाठी आलेल्या जनावरांचा चिखलात पाय फसून मृत्यू होण्याची भीती आहे.शिवनी हे गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट आहे. शासनाच्या निर्देशानुसार हे वनतलाव जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आले. याकामासाठी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांचे मंजूरी पत्र आहे. त्यांच्या निर्देशानुसार चारही तलावांचे कामे करण्यात आली आहे. मुरूम विकण्यात आलेला नाही. याबाबत संबंधीत गावातील १६ ते १७ नागरिकांचे बयान नोंदविण्यात आलेले असून या संपूर्ण कामात पारदर्शकता आहे.- डी. पी. चकोले, वनपरिक्षेत्राधिकारी, शिवनी. हिवरा बिटाच्या वन तलावाच्या अंदाजपत्रकावर शिवनीत चार वन तलाव बांधण्यात आली. तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी कामांचे बांधकाम थांबविले होते. मात्र, वर्तमान वनाधिकाऱ्यांनी या कामांना मंजुरी दिली. कामावरील मुरूम शिवनी व सालेबर्डी ग्रामपंचायत व खासगी ठिकाणी विकण्यात आले आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी.- विजय शहारे, जिल्हाध्यक्ष, मनसे, भंडारा.