शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या ३६२ जागा बसपा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:26 IST

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असताना सरकारकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा करून नागावले जात आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : राजेश नंदूरकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असताना सरकारकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा करून नागावले जात आहे. ग्रामीण विकासाच्या नावावर आश्वासनेच दिली जात आहेत. याविरोधात जनमाणसात संताप आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी बहुजन समाज पक्ष हा बहुजन समाज पॅनलखाली ग्रामपंचायतीच्या ३६२ जागा लढविणार आहे, अशी माहिती बसपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर यांनी पत्रपरिषदेत दिली.ग्रामीण भागातील जनतेत सरकारप्रती असंतोष आहे. अनेक ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांना मोबदला मिळाला नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या समस्या कायम आहेत. याशिवाय ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने बियर बारसाठी आखलेली ५०० मिटरची मर्यादा ही तरुणांसाठी धोकादायक आहे. या मर्यादेमुळे सर्वाधिक दारू दुकाने ही ग्रामीण भागात उघडले जाऊन तिथे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. या सर्व प्रकाराला विरोध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी बसपा प्रयत्न करणार आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नगर परिषदांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. नंदूरकर म्हणाले. पत्रपरिषदेला बसपाचे जिल्हा महासचिव शशिकांत भोयर, जि.प. सदस्य रेखा भुसारी, शहर अध्यक्ष निरंजन दलाल, पवनी शहर अध्यक्ष राजाराम गणविर, संजय सावरकर, शबाना शेख, प्रिया शहारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.