शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या ‘मंद’ गतीचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:21 IST

सर्वत्र आॅनलाईन व्यवहार झाल्याने इंटरनेटची आवश्यकता असते. बहुतांश कार्यालयात शासनाच्या अखत्यारितील भारत संचार निगमची (बीएसएनएल) सेवा आहे. मात्र गत महिन्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटची गती मंदावल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणी तक्रार केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व प्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने तर आता खाजगी कंपनीची इंटरनेट सेवा घेतली आहे.

ठळक मुद्देलिंक फेलचे ग्रहण : जिल्हा बँकेने केली पर्यायी व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वत्र आॅनलाईन व्यवहार झाल्याने इंटरनेटची आवश्यकता असते. बहुतांश कार्यालयात शासनाच्या अखत्यारितील भारत संचार निगमची (बीएसएनएल) सेवा आहे. मात्र गत महिन्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटची गती मंदावल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणी तक्रार केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व प्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने तर आता खाजगी कंपनीची इंटरनेट सेवा घेतली आहे.भंडारा जिल्ह्यात सर्वत्र बीएसएनएलचे जाळे आहेत. सर्व शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये बीएसएनएलचीच सेवा घेतली जाते. परंतु गत महिन्याभरापासून बीएसएनएलची सेवा ठेपाळली आहे. वारंवार लिंक फेल होत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. राष्टÑीयकृत बँकासह विविध शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प पडते. नागरिकांच्या रोषाचा सामना या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना करावा लागतो. याबाबत संबंधितांनी वारंवार बीएसएनएलकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी विविध कारणे सांगितले जातात. केबल तुटला आहे, दुरुस्तीचे काम सुरु आहे, असे ठेवणीतील उत्तर दिले जाते.सर्वाधिक फटका ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखांना बसत आहे. विविध कामांसाठी आलेल्या ग्राहकांना विशेषत: शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागतो. लिंक मिळत नसल्याने कर्मचारी ठप्प बसून असतात. याठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने वादाचे प्रसंग निर्माण होतात. बीएसएनएलच्या कारभाराचा मनस्ताप मात्र याठिकाणी कार्यरत कर्मचाºयांना सोसावा लागतो. याप्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने आता आपल्यासर्व शाखांमध्ये रिलायन्सीची सेवा घेण्याचे ठरविले आहे. १४ शाखांमध्ये रिलायन्सची सेवा घेण्यात आली असून इतर ठिकाणीही ही सेवा लवकरच घेतली जाणार आहे.बीएसएनएल कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. प्रत्येक वेळी नवीन कारण सांगितले जाते. त्यामुळे आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. बीएसएनएलच्या विरोधात केंद्र सरकारकडे रितसर तक्रार करण्यात येईल. ग्राहकांना होत असलेल्या त्रसाबद्दल आम्ही दिलगिर आहोत.- सुनील फुंडे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, भंडारा