शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर लिपीक कहालकरला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2016 00:35 IST

सेवापुस्तकातील जुन्या नोंदी अद्यावत करण्यासाठी एक हजाराची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक ...

बांधकाम विभागातील प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडाभंडारा : सेवापुस्तकातील जुन्या नोंदी अद्यावत करण्यासाठी एक हजाराची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक अरूण कहालकरला २००५ मध्ये रंगेहात पकडले होते. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधिश एस. आर. शर्मा यांनी एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. भंडारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याची बदली गोंदिया येथे झाली होती. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला शासकीय सेवेची नोंद घेण्यासाठी सेवापुस्तिकेची गरज होती. या सेवापुस्तिकेत जुन्या नोंदी अद्ययावत करून घेणे आवश्यक होते. तसी सेवापुस्तिकेत नोंद करून गोंदिया जिल्हा परिषदला पाठविण्याचे सांगितले. सदर सेवापुस्तिकेच्या नोंदीचे काम जिल्हा परिषद भंडारा येथे कार्यरत अरूण महादेव कहालकर या कनिष्ठ लिपिकाकडे होते. कहालकरने सदर कर्मचाऱ्यास सेवापुस्तिकेत नोंद घेण्यासाठी एक हजार रूपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने सदर कर्मचाऱ्याने याबाबत भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून कहालकरला १० नोंव्हेंबर २००५ ला पैसे घेताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवून तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुभाष पानसे यांनी प्रकरण न्यायदानासाठी विशेष न्यायालयात सादर केले. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग - १ एस. आर. शर्मा यांनी सर्व साक्षपुरावे तपासले. यात कहालकर दोषी आढळून आले. याप्रकरणी गुरूवारी न्यायाधीश ए. आर. शर्मा यांनी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.(शहर प्रतिनिधी)