शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना आजन्म कारावास

By admin | Updated: August 17, 2014 22:58 IST

जुन्या वैमनस्यातून तामसवाडी येथील प्रमोद राधेश्याम कोहपरे (२४) याचा २०१३ मध्ये खून करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश शाम चव्हाण यांनी रणजित घनश्याम कोहपरे

प्रकरण तामसवाडीतील खुनाचे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकालभंडारा : जुन्या वैमनस्यातून तामसवाडी येथील प्रमोद राधेश्याम कोहपरे (२४) याचा २०१३ मध्ये खून करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश शाम चव्हाण यांनी रणजित घनश्याम कोहपरे (२१) व क्रिष्णा हरिराम इखार (२३) या दोघांना एक हजार रुपये दंड व आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील प्रमोद कोहपरे याचे रणजित कोहपरे व क्रिष्णा इखार यांच्याशी घटनेच्या वर्षभरापूर्वी क्षुल्लक कारणावरून शाब्दीक बाचाबाची व धक्काबुक्की झाली होती. याचा वचपा काढण्याचा बेत या दोघांनी आखला होता.२५ मार्च २०१३ ला मृतक प्रमोद कोहपरे हा तामसवाडी कर्कापूर मार्गावरील हनुमान मंदिराजवळील शेताकडे सायंकाळच्या सुमारास गेल्याची माहिती रणजित व क्रिष्णा यांना मिळाली. यावरून दोघांनीही धारदार शस्त्रासह त्याचा पाठलाग केला. त्याला एकटा असल्याचे बघून दोघांनीही त्याची वाट अडविली. यावेळी तिघांमध्ये हातापाई झाली व त्याला जमिनीवर पाडले. रणजितने मृतक प्रमोदचे हातपाय पकडून ठेवले व क्रिष्णाने त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले व यातच तो गतप्राण झाला. ही घटना लाला गोविंदा पांडे व रमेश इसरू उके यांनी बघितली. सदर घटनेची माहिती त्यांनी मृतकाच्या वडीलांना दिली. पोलिसांना घटनेची माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर गाडामोडे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र बनवून न्यायदानासाठी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शाम चव्हाण यांच्या न्यायालयात प्रकरण सादर केले.याप्रकरणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा यांनी साक्ष पुरावे तपासले. यात रणजित कोहपरे व क्रिष्णा इखार या दोघांनीही खून केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना एक हजार रुपये दंड व आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाकडून अ‍ॅड.शाम चव्हाण यांनी युक्तीवाद केला. तर आरोपीकडून अ‍ॅड.स्वामी यांनी बाजू मांडली. तुमसर पोलीस ठाण्याचे नायक पोलीस शिपाई राजू भोंगाडे यांनी युक्तीवाद अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)