शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

वनरक्षकावर दोघांनी केला प्राणघातक हल्ला

By admin | Updated: June 10, 2017 00:18 IST

संरक्षित वनजमिनीवर अतिक्रमणाच्या वादातून दोन भावांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात घुसून एका वनरक्षकावर प्राणघातक हल्ला केला.

गोबरवाही पोलिसात तक्रार : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : संरक्षित वनजमिनीवर अतिक्रमणाच्या वादातून दोन भावांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात घुसून एका वनरक्षकावर प्राणघातक हल्ला केला. यात वनरक्षक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. वनरक्षकाने आरोपींच्या वहिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी वनरक्षकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी ४ च्या सुमारास नाकाडोंगरी येथे घडली.नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राअंतर्गत गट क्रमांक १० ते गट क्रमांक १२ दरम्यान दिलीप अनंतराम घडले, गोल्टी अनंतराम घडले यांनी विटाभट्टी सुरू केली आहे. ही जमीन वनविभागाची असल्याचे सांगण्यात येते. गटक्रमांक १० व गटक्रमांक १२ चे टीएलआर करा अशा सूचना घडले बंधूना देण्यात आल्या होत्या. गटक्रमांक हा वनविभागाचा संरक्षित क्षेत्र आहे. ६,७,८ तारखेला वनविभागाने चार कोटी वृक्ष लागवड उपक्रमांअंतर्गत खड्डे खोदले होते. वनरक्षक वैभवा उगले यांनी वनविभागातील चौकीदार रामा गौपाले, वनरक्षक सतीष बुरडे तथा बीटरक्षक ए.एन. बेडके यांना मौका स्थळावर पाठविले. तिथे खड्डे बुजविलेले आढळले. वनपरिक्षेत्र कार्यालयात परत येवून तिघांनी ही माहिती दिली. कार्यालयात वनपरिक्षेत्राधिकारी एम.एन. माकडे, वनरक्षक वैभव उगले बसले होते. कार्यालयात दिलीप घडले व त्याचा भाऊ गोल्टी घडले यांनी प्रवेश केला. वैभव उगले कुठे आहे अशी विचारणा त्यांनी कर्मचाऱ्यांना केली. दिलीप व गोल्टी घडले यांनी वैभव उगलेला धक्काबुक्की केली. दरम्यान गोल्टीने लोखंडी सामानाने डोळ्यावर व इतरत्र मारहान केली. वैभव उगले रक्तबंबाळ झाले. मारहाण प्रकरणी वनरक्षक वैभव उगले यांनी राज्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केले आहे. रक्ताच्या थारोळ्यात वनरक्षक यांना गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेले. दिलीप घडले व त्याचा भाऊ गोल्टी घडले यांना गोबरवाही पोलिसांनी अटक केली. दरम्यान वनरक्षक वैभव उगले यांनी दिलीप व गोल्टी घडले. यांच्या वहिनीचा विनयभंग केल्याची तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी वैभव उगले यांच्यावर भांदवी ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास हवालदार तांडेकर तथा सहायक फौजदार मेश्राम करीत आहेत.दिलीप व त्याचा भाऊ गोल्टी घडले यांनी वनरक्षक वैभव उगले यांना केलेली मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वनरक्षक वैभव उगले यांनी आरोपींच्या वहिनीचा विनयभंग प्रकरणी वनरक्षक वैभव उगले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरू आहे.-किशोर झोटींग, सहा. पोलीस निरीक्षक गोबरवाही.