शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

बोधिचेतिय विहारात धम्ममेघा धम्मसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:52 IST

बोधिचेतिय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एमआयडीसी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसर, खुटसावरी मार्ग या पर्यावरण स्थळी रविवारला धम्ममेघा धम्मसंमेलन उत्साहात पार पडले.

ठळक मुद्देमान्यवरांचे मार्गदर्शन : विविध कार्यक्रमांचे आयोजन, बुद्ध-भीम गीतांचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बोधिचेतिय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एमआयडीसी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसर, खुटसावरी मार्ग या पर्यावरण स्थळी रविवारला धम्ममेघा धम्मसंमेलन उत्साहात पार पडले.भिक्षु संघ केळझरचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थविर, यांच्या अध्यक्षतेत पत्र्त्रामेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न मानके, बौद्ध प्रशिक्षण संस्थान, बुद्धभूमि नागपूरचे अध्यक्ष भदंत सत्यशील महाथेरो, भदंत संघकीर्ती थेरो, भिक्षु बोधानन्दसह सचिव, बौध्द प्रशिक्षण संस्थान, बुद्धभूमि, नागपूर, भिक्षु जीवक, भिक्षु धम्म शिखर, बालाघाट, भिक्षुणी धम्मदिना व त्यांचा भिक्षुणी संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तद्धवतच प्रा. वासंती सरदार, जी.एस. कांबळे औरंगाबाद यांच्या सानिध्यात, डॉ. भदंत धम्मदिप महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली खुटसावरी फाट्यापासून धम्मरॅली बँडच्या आवाजात जयभीम गर्जनेत बोधिचेतिय विहारात आली.सर्वांच्या उपस्थितीत धम्मगर्जनेने रामजी सुभेदारांच्या व भीमाई आईच्या पुर्णाकृती पुतळ्याचे विधिवत उद्घाटन झाले. समता सैनिक दलाचे विदर्भ जीओसी गजेंद्र गजभिये आणि त्यांचे सहयोगी कविराज, राजू वाहने यांनी कमान सांभाळली. एकनाथ रामटेके, केशव रामटेके यांनी त्यांना विशेष सहकार्य केले.प्रथम दर्शनी समता सैनिक भीम गायन मंडळ कोसमतोंडीच्या शालेय मुलींनी स्वागतम सुस्वागत हे अतिथी, तुम्हे हमारा प्रणाम, बाबासाहेबांच्या जीवन प्रवाहात ज्योतिबा - सावित्री फुले, शाहू राजे, रमाबाई आंबेडकरांची प्रेरणा मिळाली त्या स्वागत गीतात हाच भाग जागृत होता. अंगुलिमाल फिल्म हे मानव तु मुखसे बोल, बुद्धमं् शरण्ं गच्छामी व भिमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना या दोन रेकॉर्डिंग नृत्यांनी मृणाली खोब्रागडे धारगाव हिने श्रोतावर्गांना भारावून सोडले.डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या ११४ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. भदंत आनंद कौसल्यायन बहुमुखी प्रतिभाचे धनी हिंदी व पाली साहित्याचे प्रकांड पंडित म्हणून त्यांच्या पांडित्याची प्रशंसा केली.मुख्य पाहुण्यांनी बाबासाहेबांच्या यशोगाथेची, बुद्धांच्या वाणीची भरभरून प्रशंसा केली. सरगम ग्रुप भंडारा यांनी बुद्ध-भीम गीतांनी सर्वांचे मन मोहून घेतले.या कार्यक्रमासाठी सुषमा वासनिक, चांगुना कांबळे, अर्चना खोब्रागडे, रत्नमाला वासनिक, सुनंदा वासनिक, रचना वैद्य, शीला साखरे, द्वारका काणेकर, यशोधरा खोब्रागडे, हर्षा टेंभूर्णे, मीना कांबळे, शुक्रतारा गजभिये, लता उके, ज्योती मेश्राम, कुंदा बारसागडे, रेशमा बोरकर, फूलन गोंडाणे, प्रगती मगर, रेशमा रामटेके, पुस्तकला नंदागवळी, वैजंता लांजेवार या धम्मसेविकांनी आपली अहं भूमिका बजावली तर निवांत वासनिक, भारत नंदागवळी, केशव वालद्रे, सुजीत बडवाईक, अरविंद वासनिक, अनिल वासनिक, राजेश शहारे मिस्त्री, अजय शामकुवर, अमरदीप बोरकर, बळीराम राघोर्ते, ब्रिजलाल ठवरे, विनोद बोरकर, धमेंद्र बडोले, धनंजय रामटेके, रामकृष्ण कांबळे, डॉ. नरेश साखरे, ईश्वर बन्सोड, बी.एस. नंदा, अचल मेश्राम, मोरेश्वर बोरकर, मोहन शहारे, अनमोल कांबळे, देवानंद नंदेश्वर, मेश्राम, मारोती करवाडे, बाळा गिºहेपुंजे, मनोज वासनिक, रूस्तम बोरकर यांनी सहकार्य केले.