शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारव्हा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार लाखांदूर तालुक्यात १६ केंद्रावर धान खरेदी  सुरू करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासून विविध कारणांमुळे शेकडो शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. आता बारदान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच धान खरेदीची अंतिम तारीख ३० जून आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचा धान खरेदी होणे शक्य नाही. 

ठळक मुद्देधान खरेदीला मुदत वाढ द्या : साकोली मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आधारभूत किमत खरेदी केंद्रावर उन्हाळी धानाची खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले. शेतकऱ्यांनी लाखांदूर ते साकोली मार्गावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार लाखांदूर तालुक्यात १६ केंद्रावर धान खरेदी  सुरू करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासून विविध कारणांमुळे शेकडो शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. आता बारदान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच धान खरेदीची अंतिम तारीख ३० जून आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचा धान खरेदी होणे शक्य नाही. धान खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी बुधवारी लाखांदूर ते साकोली मार्गावर बारव्हा येथे रास्तारोको करण्यात आला. माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात गोपाल झोडे, धनू लंजे, लालचंद बुद्धे, गुलाब झोडे, राजेंद्र मेश्राम, मोरेश्वर भैसारे, मुकेश कोरे, पतीराम झोडे, हिरालाल बगमारे, सुखदेव लंजे, आदेश फुंडे, रवी डोंगरवार, घनश्याम लंजे, ऊल्हास झोडे, नितीन मेश्राम, महादेव झोडे, रघुनाथ लंजे, रेवा शेंद्रे, टिकाराम गायकवाड, बाळकृष्ण कोचे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

आश्वासनानंतर आंदोलन मागे - रास्ता रोको आंदोलनला नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, दिघोरीचे ठाणेदार नीलेश गावंडे, विजयलक्ष्मी राईस मिलचे सचिव आशिष बुरडे, आभास बेरोजगार संस्थेचे संचालक बाळू दहिवले यांनी भेट दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड व जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता येत्या दोन दिवसांत धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप