शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: March 24, 2015 00:15 IST

सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे.

साकोली : सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. जेव्हा केंद्रात व राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे आता दिसेनासे झाले आहेत. यावर्षी गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. धानाला भाव नाही. त्यामुळे निसर्गासोबतच शासनही शेतकऱ्यांवर कोपला आहे. आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी केली. लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ.राजेंद्र जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, अविनाश ब्राम्हणकर, सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, पद्माकर गहाणे, दामाजी खंडाईत, सुरेश कापगते, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, हेमकृष्ण वाडीभस्मे, डॉ.अनिल शेंडे, एन.सी. लोधीकर उपस्थित होते.यावेळी सदाशिव वलथरे यांनी काही राजकारणी लोक खोटे बोलून, आमीष दाखवून राजकारण करतात. त्यामुळे अशा राजकारण्यांजवळ कार्यकर्ते जास्त काळ टिकून राहत नाही अशीच परिस्थिती विरोधी पक्षाची झाली आहे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांच्या भावना जाणणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी मनापासून काम करायला हवे, तरच पक्ष मजबूत होईल, असे सांगितले.संचालन सुधन्वा चेटुले यांनी तर आभार प्रदर्शन अनिल टेंभरे यांनी केले. कार्यक्रमाला अंगराज समरीत, सुरेश बघेल, उर्मिला आगाशे, जया भुरे, रामचंद्र कोहळे, सुरेखा शहारे, डॉ.राजेश चंदवानी, अ‍ॅड.अग्रवाल, शैलेश गजभिये, हेमंत भारद्वाज, ओम गायकवाड, रवी राऊत, मुशीर खान, राशीद कुरैशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वासुदेव तितीरमारे व जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक अमृत मोहनकर यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (तालुका प्रतिनिधी)