शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

भाजपने मारली मुसंडी

By admin | Updated: May 16, 2014 23:47 IST

संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी नाना पटोले यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली.

भंडारा : संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी नाना पटोले यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा १ लाख ४९ हजार ८३६ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे गेल्यावेळच्या (२00९) लोकसभा निवडणुकीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या बसपासह यावेळी चर्चेत आलेल्या आम आदमी पार्टीच्या आणि इतर सर्वच पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांची यावेळी जमानत जप्त झाली.

नाना पटोले यांना एकूण ६ लाख ६ हजार १२९ मते मिळाली तर पराभूत उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना ४ लाख ५६ हजार ८७५ मते मिळाली. सायंकाळी ७.३0 पर्यंत अंतिम निकाल जाहीर होणे बाकी होते. मात्र पटोले यांच्या विजयाचा कल दुपारी १२ वाजताच स्पष्ट झाला होता. त्यामुळे भंडारा आणि गोंदियात कार्यकर्त्यांचा जल्लोष दुपारपासूनच सुरू झाला होता. फटाके उडवत, गुलाल उधळत आणि ढोलताशावर नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

सकाळी ८ वाजता सुरक्षा यंत्रणेच्या कडक बंदोबस्तात भंडारा येथील सामाजिक न्याय भवनात मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी सामाजिक न्याय भवनाकडे जाणार्‍या सर्व मार्गावर पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे उभारण्यात आले होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात आली होती.

विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच नाना पटोले यांनी आघाडी घेतली. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींचा चांगलाच भ्रमनिरास झालेला दिसत होता. अनेकांनी दुपारी १२ नंतर तेथून काढता पाय घेतला. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नाना पटोले यांनी सजविलेल्या वाहनावरून भंडार्‍यात मिरवणूक काढली. मात्र मिरवणुकीला अधिकृत परवानगी नसल्यामुळे कोणताही बँड वगैरे न लावताच ते खुल्या जीपवरून फिरले. निकाल ऐकण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर भाजप कार्यकर्ते भंडार्‍यात दाखल झाले होते.