शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

By admin | Updated: January 9, 2017 00:24 IST

जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे महापुरुषांचे कार्य पुढे नेणे ही सर्वांची जवाबदारी आहे.

५० संघटनांचा सहभाग : सरकारविरोधी दिल्या घोषणाभंडारा : जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे महापुरुषांचे कार्य पुढे नेणे ही सर्वांची जवाबदारी आहे. समाजातील जातीसमूह व घटकांचे एकत्रिकरण करून बहुजन समाजाच्या हक्क अधिकारांच्या समर्थनार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज भंडाऱ्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा मैदान येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या मोर्च्याचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्च्याचे मुख्य संयोजक समीर कदम, प्राध्या. वासनिक, बळीराम सार्वे, विलास खोब्रागडे, नरेंद्र मडावी, शीतल पिल्लेवान, सुधीर पिल्लेवान, माधवराव फसाटे, देवचंद वैद्य यांनी केले. वाढत्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात ओबीसी, एस.टी., व्ही.जे.एन.टी., डी.एन.टी., बलुतेदार व धार्मिक अल्पसंख्यांक यांचा बहुजन क्रांती मोर्चात समावेश होता. रविवारला हा मोर्चा दसरा मैदान येथून निघाला. त्यानंतर मोर्चेकरी शहरातील मुख्य मार्गाने घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. तत्पूर्वी या मोर्चाला समर्थन देणाऱ्या विविध ५० संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दसरा मैदानावर एकत्रित झाले होते. यावेळी तिथे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिस्तबध्द पध्दतीने धडकला. या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोपर्डी येथील अत्याचार करणाऱ्यावर व आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, पीडितांना संरक्षण देऊन न्याय द्यावा, देशात महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, राष्ट्रीय स्तरावर एस.टी., एस.सी. प्रमाणे ओबीसी, भटके विमुक्त प्रवर्ग व बलुतेदार यांची जातीनिहाय जनगणना करावी, राखीव जंगलावरील नोकरीतील अनुशेष तात्काळ भरावा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मुस्लिम समाजाला सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून १२ टक्के आरक्षण लागू करावे, ग्रामपातळीवर सेवा देणारे कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, मुलींच्या वस्तीगृहात स्त्री अधीक्षकाची नियुक्ती करावी. उद्योगपतींना देण्यात आलेली कर्जमाफीसारखा लाभ शेतकऱ्यांना द्यावी. छोटी किंवा मोठी धरण असलेल्या भागातील मच्छीमार बांधवाना मासेमारीचा हक्क द्यावा, विद्यार्थी पटसंख्येच्या नावावर ग्रामीण भागातील शाळा बंद करुन शिक्षकांना अतिरिक्त ठरवून बहुजनांचे शिक्षण संपविण्याचे कटकारस्थान थांबवावे, एस.सी., एस.टी., ओबीसी च्या राखीव जागांवरील नोकरीतील अनुशेष तात्काळ भरावा. राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी. अल्पसंख्याक समुदायांसाठी कॅम्युनल राईटस् अ‍ॅक्ट बनविण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा व राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभुषा केलेले बालक मोर्च्याच्या अग्रस्थानी सर्वांचे आकर्षण करीत होते. मोर्च्यात नरेंद्र मडावी, शिवदास गजभिये, आनंद मैदमवार, सदानंद इलमे, राजेश मेश्राम, अशोक शेंडे, राजेश कांडे, शबीर पठाण, पविता पाटील, शिला रामटेके, भावना बोरकर, सुचिता गजभिये, अश्विनी डोंरगे, करुणा डांगे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)