विधानसभेवर मोर्चा धडकणार : पत्रपरिषदेत मांडल्या व्यथालाखनी : स्थानिक विदर्भ (उंट) बिडी कंपनीच्या महिलांवर अन्याय करून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण केला आहे. महिला कामगार न्याय मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती देवानंद उके यांनी दिली आहे.विदर्भ (उंट) बिडी कंपनी लाखनीत कार्यरत होती. बंद असलेली कंपनी पूर्ववत सुरु करावी, कंपनी जेव्हापासून बंद आहे, तेव्हापासून महिला बिडी कामगारांना प्रत्येकी ७ लाख रुपये देण्यात यावे, बिडी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, प्रत्येक बिडी कामगारांना घरकुल देण्यात यावे, वृद्ध बिडी कामगारांना निवृत्ती वेतन देण्यात येते, यात ५ हजार रुपयांची विशेष वाढ करावी, उंट बिडी कंपनी बंद झाल्यापासून कामगारांना बोनस मिळाला नाही. तो देण्यात यावा आणि भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या देण्यात याव्यात, बिडी कामगारांचे वेतन वाढविण्यात यावे, बस प्रवास मोफत करण्यात यावा, यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.बहुजन समाज अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन सामाजिक संघटनाद्वारे सभेचे आयोजन दि. १५ डिसेंबर रोजी महाप्रज्ञा बौद्ध विहारात दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. बिडी कामगार गेल्या आठ वर्षीपासून न्याय हक्कासाठी लढत आहेत. व्यवस्थापनाने कोणतीही सूचना न देता कारखाना बंद केला. त्यामुळे कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले. त्यांच्याकडे राजकीय पुढारी व प्रशासनाने दुर्लक्ष केले आाहे. यासाठी लढा उभारण्यात येणार आहे. पत्रपरिषदेत बिडी कामगार संघटनेचे पदाधिकारी शशीकला जांभुळकर, सुनिता राऊत, मंदा फुलेकर, विद्या केळकर, वैशाली वालदे, प्रतिमा मेश्राम, सुषमा ढवळे, मंदा अंबादे, विद्या राऊत, देवा उके, श्रीकांत नागदेवे, सुधीर मेश्राम, डॉ.सिकंदर गोस्वामी, कविराज गजभिये, जितेंद्र हुमणे, पवन निर्वाण, अनिल गणवीर, गजेंद्र गजभिये, नितीन शामकुवर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
बिडी कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: December 15, 2015 00:49 IST