शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

भवसागर, श्यामकुवर विजयी

By admin | Updated: January 12, 2016 00:32 IST

तुमसर नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांचा पराभर करीत अपक्ष उमेदवार किशोर भवसागर यांनी दणदणीत विजय संपादन केला.

पोटनिवडणूक : तुमसरात अपक्षाची तर लाखनीत काँग्रेसची बाजीतुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांचा पराभर करीत अपक्ष उमेदवार किशोर भवसागर यांनी दणदणीत विजय संपादन केला.अपक्ष उमेदवार किशोर भवसागर यांना १,१६१ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद गडपायले यांना ७५४ मते, अनिल सावठणे यांना ६९९ मते, भाजपचे नवनाथ मेश्राम यांना ५३६ मते, काँग्रेसचे निलेश वासनिक यांना २४९, सुधिर दहाट १३४ मते, नितिन गजभिये यांना १०५ मते मिळाली. भवसागर यांचे मोठे बंधु व पत्नी या नगरसेविका म्हणून निवडून आले होते, हे विशेष. प्रभाग क्रमांक १ मध्ये नगरसेवक पदाच्या जागेकरिता पोटनिवडणूक घेण्यात आली. आठ महिन्याचा कालावधी नगरसेवकाला मिळणार असल्याने राष्ट्रीय पक्षाने उमेदवार लढविणार नाहीत, असे वाटत होते. परंतु आगामी विधान परिषद निवडणूक लक्षात घेऊन सर्वच राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरविले होते. परंतु प्रभाग क्रमांक १ च्या मतदारांनी पक्षाच्या उमेदवारांना नापसंती दर्शवून अपक्ष उमेदवार किशोर भवसागर यांना पसंती दिली. (शहर प्रतिनिधी)लाखनी : पिंपळगाव (सडक) पंचायत समिती क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे पंकज श्यामकुंवर हे विजयी झाले. त्यांनी भाजपचे सुबोध मेश्राम यांचा पराभव केला. काँग्रेसचे पंकज श्यामकुंवर यांना २०७७, भाजपचे सुबोध मेश्राम यांना १९६४, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर मेश्राम यांना ४२८, बसपाच्या हर्षदीप गणवीर यांना ३८९ मते मिळाली. नोटाला ९९ मतदारांनी प्रतिसाद दिला. तहसिल कार्यालयात सकाळी १०.३० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डी. सी. बोंबर्डे, सहायक निवडणुक अधिकारी नायब तहसीलदार एस. ए. धारगडे, धुर्वे, गेडाम, श्रीकांत नागलवाडे, नीळकंठ गोटेफोडे, शिवणकर, मोहोड, गिऱ्हेपुंजे यांनी काम पाहिले. विजयाच्या घोषणेनंतर विजयी उमेदवारांची मिरवणुक काढण्यात आली. यात जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, तालुका अध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, होमराज बोरकर, जितेंद्र भदाडे, रूपलता जांभुळकर, अश्विन गोस्वामी, राजकमल उके सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)राष्ट्रवादीने दिला दगा -वाघायेलाखनी तालुक्यातील पिंपळगाव पंचायत समिती क्षेत्राचे सदस्य मुन्नेश्वर नंदेश्वर यांचे निधन झाले होते. अशा स्थितीत काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न करता मदत करता येऊ शकली असती. परंतु भाजपच्या विजयासाठी राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला. असे असतानाही काँग्रेसने ही जागा जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमचा नेहमी विश्वासघात होतो. यापूढे कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यात येणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली आहे. ही भूमिका येत्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना दाखवू, असा इशाराही माजी आमदार सेवक वाघाये यांनी दिला.