‘लोकमत’ची दखल : आमदार व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरजअशोक पारधी पवनीशालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अधीनस्थ असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर नव्याने बहुउद्देशीय सभागृह व क्रीडांगणाचे बांधकाम करण्यात आले. परंतु क्रीडांगणाचे जागेवर भसवाऐवजी भीस प्रकारातील माती वापरल्याने खेळांडूची गैरसोय होईल, असे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांनी क्रीडांगणाची पाहणी केली. दीड महिन्यानंतर भीस प्रकारातील मातीवर भसवा प्रकारच्या मातीचा थर पसरविण्यात आलेला आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे उजव्या कालव्याचे खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात भीस नहराचे बाहेर काढण्यात आलेली होती. त्या भीसचा वापर नागरिकांनी जमिनीवर भरणासाठी मोठ्या प्रमाणात केला. त्याचेवळी क्रीडांगण समतल करण्याचे काम सुरू झाले. नहराचे बाहेर काढण्यात आलेली भीस क्रीडांगणावर वापरण्यात आली. भीस प्रकारातील मातीवर पाणी टाकल्यास चिखल तयार होतो. पाण्याचा निचरा झाल्यास भीस दगडासमान कठीण बनते, या गुणधर्मामुळे या प्रकारातील माती क्रीडांगणावर वापरल्या जात नाही. परंतु कमी खर्चात सहज उपलब्ध झाल्याने भीस प्रकारातील माती क्रीडांगणासाठी वापरण्यात आली. भविष्यात खेळाडूंना ही माती त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले. भसवा प्रकारातील मातीमध्ये वाळूचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याचा निचरा होण्याचा गुणधर्म या मातीमध्ये असतो. क्रीडांगणासाठी भीस प्रकारातील मातीचा वापर करण्यात येत असते. परंतु एक ते दीड इंचाचा भर दिल्यास क्रीडांगण खेळाडूंना खेळण्यासाठी योग्य होईल याची खात्री देता येत नाही. क्रीडांगावर भसवा पसविण्यात आलेला आहे परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या प्रकाराकडे आमदार व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर 'भसवा'
By admin | Updated: April 30, 2016 00:36 IST