शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा, तुमसर, शहापुरात घरफोडी

By admin | Updated: August 2, 2016 00:27 IST

भंडारा शहरासह जिल्ह्यात अलिकडे घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत...

आरोपीला अटक : एकाच रात्री तीन दुकान फोडलेभंडारा : भंडारा शहरासह जिल्ह्यात अलिकडे घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे घरफोडी असल्यामुळे घर रिकामे ठेऊन जाणे कठिण झाले आहे. पोलिसांची गस्त नियमित होत नसल्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. भंडाऱ्यात सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला तर शहापुरात एकाच रात्री तीन दुकाने फोडली. तुमसरात ५० हजाराचा ऐवज लंपास केलेल्या एका चोरट्याला तुमसर तुमसर पोलिसांनी दोन तासात मुद्देमालासह शेतशिवारातून अटक केली. घरफोडीत लाखोंचा ऐवज लांबविलाभंडारा : घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. यात त्यांनी १ लाख १५ हजार ६०० रूपयांचे सोन्याचांदीचे दागिणे लांबविल्याची घटना उघडकीस आली. शहरातील स्टेशनरोडवरील सुयोग नगरातील राधेश्याम चोपकर हे कुटूंबासह २७ जुलैपासून बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप लावून असल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधली. त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सोन्याचांदीचे दागिण्यांची चोरी केली. बाहेरगावाहून परतल्यानंतर चोपकर यांच्या लक्षात आली. याप्रकरणी त्यांनी भंडारा पोलिसात अज्ञात चोराविरुध्द तक्रार दाखल केली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वाडे करीत आहे. (शहर प्रतिनिधी) शहापुरात एकाच रात्री तीन दुकाने फोडलीशहापूर : येथे ३१ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन दुकानाचे शटर फोडून चोरी केली असून नगदी रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. शहापूर येथील सोपान भुरे यांचे महामार्गावर बुट हाऊस आहे. ३१ जुलैच्या रात्री त्या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने फोडून दुकानात प्रवेश केला व दुकानाच्या गल्ल्यातील चार हजार घेऊन चोरटे पसार झाले. सोपान भुरे यांच्या घरी भाड्याने राहत असलेले तारेन्द्र रहांगडाले यांची दुचाकी घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रविण हावरे यांची सुवर्णा कलेक्शन नावाच्या दूकानाचे शटर सुध्दा फोडले आहे. तसेच बँक आॅफ इंडियाच्या बाजुला असलेली देवचंद कुंभारे यांची अभिनंदन किरणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी फोडले. सोपान भुरे व तारेंद्र रहांगडाले यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक नागरे करीत आहेत. (वार्ताहर)मुद्देमालासह घरफोड्या गजाआडतुमसर : भर दुपारी घरी कुणीच नाही ही संधी साधून घराचा कुलूप तोडून ४५ ते ५० हजाराचा सोन्याचा ऐवज चोरट्याने लंपास केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या दोन तासात घरफोड्याला मुद्देमालासह तुमसर पोलिसांनी शेतशिवारातून अटक केली. ३ आॅगस्टपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घरफोडीची घटना खापा तुमसर येथे रविवारी घडली. संदीप राजाराम भोयर (३५) रा. खरबी असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विष्णू श्रीराम ठवकर, रा. खापा रविवारी सकाळी १० वाजता शेतावर गेले होते. घरी कुणीच नव्हते. घराचा मागील दार तुटला दिसल्याने विष्णु ठवकर यांना शंका आली. घरात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचे समजले. तक्रारीनंतर दुपारी १.३० वाजता तुमसर पोलिसांचे पथक खापा येथे दाखल झाले. चौकशीअंती खापा येथील नागरिकांनी आरोपी व त्यांचा साथीदार खापा येथे दुपारी फिरत होते, अशी माहिती दिली. पोलीसांनी खरबी गाठले. एका शेतात संदीप लपून बसला होता. सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले. संदीपची झडती घेतल्यावर त्याच्या खिशात किंमतीचे सोन्याचे दागिने आढळले. तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोनपिपळे, उपनिरीक्षक श्रीवास, प्रणय चौधरी, विनोद थोटे, अश्विन सोनकुंवर, राजु साठवणे यांनी कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)