शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा - गोंदिया जिल्ह्यांसाठी पुन्हा आला प्राणवायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST

भंडारा : ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावू नये, रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल ...

भंडारा : ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावू नये, रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे सातत्याने प्रयत्नरत आहेत. गेल्या दोन दिवसात त्यांनी भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला आहे. त्यानंतर शनिवारी पुन्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्सिजन घेऊन दोन टँकर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामुळे ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.

भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णांचे जीव धोक्यात आले होते. हीच बाब लक्षात घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. तसेच दोन्ही जिल्ह्यांसाठी नियमित ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यास सांगितलेे होते. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० टनचे दोन ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करुन देण्यात आले. त्यानंतर शनिवारी नागपूर येथून लिक्विड ऑक़्सिजन घेऊन दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एक-एक टँकर दाखल झाला. गोंदिया येथे श्याम ट्रेडर्सकडे टँकर क्रमांक (एमएच ४० एन ५२४०) तर भंडारा येथील सनफ्लॅग येथे टँकर क्रमांक (एमएच ४०, ७०३२) दाखल झाले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.

दोन्ही जिल्ह्यात निर्माण झालेल्या कोविड परिस्थितीवर खासदार प्रफुल्ल पटेल यांचे लक्ष असून, ते दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. माजी आमदार राजेंद्र जैन हे सुध्दा दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थिती संदर्भातील माहिती खासदार पटेल यांना देत आहेत.