शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 11:11 IST

जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.

ठळक मुद्देउन्हामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.उन्हाच्या वाढत्या झळांचा फटका शेळ्या,मेंढ्या,दूघ उत्पादकांना बसू लागला आहे.गुरांसह, बकऱ्यांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात मेंढपाळांची ससेहोलपट होत असून जास्त प्रमाणात बकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेळीपालन,मेंढपालनावर चालतात.ग्रामीण भागात चरीतार्थाचे साधन म्हणून शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत.परंतु मुख्यालयी असणारे पयुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाºयांनी उप स्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पाणीटंचाईमुळे ईतर जिल्ह्यातील देखील मेंढपाळांचे कळप चाऱ्याच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. यामध्ये अन्य जिल्ह्यातील मेंढपाळ आले आहेत. उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा हे मेंढराचे कळप पुन्हा आपल्या जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली की परत जात असतात.जिल्ह्यात सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात हे कळप चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील शेतीचा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रब्बीची पीके काढली आहेत. त्यामुळे शेतशिवारे रिकामे झाल्यामुळे मेंढपाळांना चारा काही प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र पाण्याचा तुटवडा जाणवत अ सल्याने जेथे पाण्याची सोय आहे त्याच भागात हे कळप स्थिरावत आहेत.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असणारे पाझर तलाव, विहिरी, कुपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी बकऱ्यांना पिण्याचे पाणी व चरण्यासाठी झाडपाला मिळत नसून मेंढपाळांना स्वत:च्या आरोग्यासह आपल्या जितराबांचा प्रश्न सतावतो आहे. मेंढपाळांसोबत स्वत:चे कुटुंब असल्याने चिमुकल्या मुलांचे आरोग्यही बिघडत आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून दुर्लक्षीत असणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.उष्माघाताचा पशुधनाला बसतोय फटकाउन्हाच्या वाढलेल्या काहीलीमुळे जिल्ह्यातील पशुधनाला फटका बसत असून वाढत्या तापमानामुळे अनेक पशुपालक धास्तावलेले आहेत.गाई,म्हशी, शेळ्या ,मेंढ्यासह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून काही ठिकाणी बकºया उष्माघाताच्या बळी ठरत आहेत. शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेतात बसवलेल्या मेंढ्यांना चारापाण्याच्या शोधार्थ राणावणातच भटकावे लागते. पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने पशूंना वळेवर उपचार मिळत नसल्याने बकºयांसह, मेंढ्यांना याचा फटका बसत आहे.

टॅग्स :foodअन्न