शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहर एलईडीने होणार प्रकाशमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:24 IST

महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार संपुर्ण शहरात एल.ई.डी. पथदिवे लावून विजेची बचत व्हावी हा उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून भंडारा नगर परिषदेनी साधारणता पाच कोटी खर्च करुन संपूर्ण शहराचे पथदिवे एल.ई.डी. पथदिवे द्वारे बदलवून देण्याचे कंत्राट ई.ई.एस.एल. या कंपनीला दिले असून कंपनीद्वारे हे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे काम सुरु झाले आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेची दिवाळी भेट : विजेची बचत व्हावी हेच एकमेव उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार संपुर्ण शहरात एल.ई.डी. पथदिवे लावून विजेची बचत व्हावी हा उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून भंडारा नगर परिषदेनी साधारणता पाच कोटी खर्च करुन संपूर्ण शहराचे पथदिवे एल.ई.डी. पथदिवे द्वारे बदलवून देण्याचे कंत्राट ई.ई.एस.एल. या कंपनीला दिले असून कंपनीद्वारे हे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे काम सुरु झाले आहे.दिवाळी पुर्वी शहराच्या सर्व मुख्य मार्गावरील पथदिवे बदलविण्याचे काम पुर्ण होईल असे नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. संपुर्ण शहरातील हायमास्ट खांबासहीत प्रत्येक खांबावरील पथदिवे एल.ई.डी. पथदिवे व्दारे बदलवून संपुर्ण शहर प्रकाशमय होईल असे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले.ही शहरवासीयासाठी नगर परिषदेद्वारे प्रकाशपर्वावर प्रकाशमय एक भेट ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सदर कामाची सुरुवात गांधी चौकापासून करण्यात आलेली आहे. सर्व शहरवासियांना या उपक्रमाचा लाभ होईल यामुळे सवार्नी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष आशू गोंडाणे, नगरसेवक मकसुद बंसी, शमीम शेख, अजिज शेख, जुगल भोंगाडे, मिलिंद मदनकर, दुपारे(विद्युत अभियंता) व कपाटे (संगणक अभियंता) तसेच नगर परिषद कर्मचारी वृंद व नागरिक उपस्थित होते.या उपक्रमामुळे नगर परिषदेची होणारी दर महिन्याची विजेच्या बिलामधून जी बचत होईल त्यातून सदर कामाची किंमंत वसुल होईल असे नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले.तसेच सात वर्षाकरीता देखभाल व दुरुस्ती कंपनी व्दारे करण्यात येईल. त्यामुळे सात वर्षापर्यंत नगर परिषदेला कुठलाही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे दरवर्षी होणारा देखभाल दुरुस्तीच्या खर्चास मोठ्या प्रमाणात बचत येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.