शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

भंडारा : कोरोनानंतर सर्वत्र ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे आता अनेकजणांचा घरबसल्याच ऑनलाईनच खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. ...

भंडारा : कोरोनानंतर सर्वत्र ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे आता अनेकजणांचा घरबसल्याच ऑनलाईनच खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव तसेच आगामी दुर्गा उत्सवासाठी ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी विविध कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने दिली जातात. अनेकजण याच संधीचा फायदा घेत मोबाईलवर विविध लिंक पाठवतात. यातूनच ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. ऑनलाईन खरेदी करताना प्रत्येकाने सावधानता बाळगण्याची गरज आहे. ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वस्तूची खरेदी केल्यानंतर त्याच्या मोबाईलवर लिंक पाठवली जाते. लिंक डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कॅश बॅक मिळेल असे खोटे संदेशही काही प्रसंगी पाठवले जातात, पण नागरिकांनी अशा प्रलोभनांना बळी न पडता अज्ञात वेबसाइटवरून पाठवण्यात आलेल्या लिंक डाऊनलोड करू नयेत, अशा लिंक डाऊनलोड करताच बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात. त्यासाठी अनेकदा महिलांना तुमच्या घरी ऑनलाईन पार्सल येत आहे. आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तुमचे बँकेत केवायसी नाही, तुमचा आधार नंबर सांगा, ओटीपी सांगा, मोबाईल नंबर सांगा असे फोन करून माहिती मागण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेकांना तर थेट लाखो रुपयांची लॉटरी लागली आहेत असे संदेश पाठवले आहेत, तर अनेकांना लॉटरी लागल्याचे फोन कॉलही येत आहेत. मात्र, नागरिकांनी सजग राहून अशा प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.

भंडारा शहरातील एका पत्रकाराला थेट २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा संदेश पाठवला आहे. यासोबतच भंडारालगतच्या बेला येथील एका ग्राहकाला फसवले आहे. टप्प्याटप्प्याने त्याच्या बँक खात्यातील पैसे उकळले होते. सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी विविध प्रकारच्या योजनांच्या ऑफर देतात. त्यानंतर ओटीपी पाठवला जातो. फोन करून ओटीपीचा नंबर मागितला जातो. तुम्हाला लॉटरी लागली आहे; परंतु आधी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर सांगा. तुमच्या खात्यावर बँकेत रक्कम जमा होईल अशा प्रकारच्या भूलथापा दिल्या जातात.

बॉक्स अशी घ्या.

बॉक्स

अशी होऊ शकते फसवणूक....

ऑनलाईन पद्धतीने वस्तूंची खरेदी करताना अनोळखी संकेतस्थळावरून विविध लिंक मोबाईलवरून डाउनलोड केल्यानंतर चांगल्या कॅशबॅकच्या ऑफरचा संदेश पाठवला जातो, पण लिंक डाउनलोड करताच ग्राहकांच्या थेट बँक खात्यातील सर्व रक्कम कमी झाल्याचे संदेश आल्यावरच समजते. सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू असल्याने नागरिकांना लॉटरी लागल्याचे संदेश पाठवले जात आहेत. लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी टप्प्याटप्प्याने ओटीपी व काहीजणांकडे पैसे मागितले जातात. मात्र, या संदेशाकडे दुर्लक्ष करणेच योग्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बॉक्स

अशी घ्या काळजी...

एखादी वस्तू खरेदी करताना त्या कंपनीच्या वेबसाईटची खातरजमा करावी. आपली वैयक्तिक माहिती अथवा ओटीपी नंबर, आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबर कुणालाही देऊ नये. अनेकदा महिलांना फोन करून बँक खाते, एटीएम, मोबाईल नंबर मागितले जातात. मात्र, असे फोन आल्यास घरातील महिलांसह सर्वांनीच सजग राहणे गरजेचे आहे. बँक कधीही ग्राहकांना कधीही फोन करून माहिती विचारत नाही.

बॉक्स

एका पत्रकारालाच २५ लाखांच्या लॉटरीचा संदेश

भंडारा शहरातील एका पत्रकारालाच २५ लाखांच्या लॉटरीचा संदेश आला आहे. यावेळी तत्काळ पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. शहरासह जिल्ह्यात अनेकांना लॉटरी लागल्याचे कॉल, तसेच अशा प्रकारचे संदेश पाठवून दिशाभूल केली जात आहे. मात्र, कुणीही अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका.