वरठी : शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात वापरली जाणारी साधणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला प्रभावी ठरतात. शासनाच्या मराठी व इंग्रजी माध्यम शाळेत शासनाने मोठ्या प्रमाणात डिजीटल शिक्षण साधणे उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे सरकारी शाळेत शिक्षण घेणारी मुले स्पर्धेत अग्रेसर ठरत आहेत. आकर्षण बरोबर दर्जेदार शिक्षणासाठी डिजीटल शिक्षण प्रणाली सर्वाेत्तम आहे, असे प्रतिपादन मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.बी. राठोड यांनी केले.एकलारी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत डीजीटल क्लॉस रूमचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य रत्नाताई फेंडर उपस्थित होते. उद्घाटन उपसरपंच युवराज सेलोकर याच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, विस्तार अधिकारी विभावती पडोळे, प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे व्यवस्थापक प्रज्ञा सावंत, माजी सरपंच पूनम बालपांडे, विलास ठोंबरे, तारा भुजाडे, भैरवी सार्वे, शिल्पा गजभिये, हेमलता गिऱ्हेपुंजे, केंद्रप्रमुख जगत उपाध्ये, ग्रामसेवक दिगांबर गभणे, संतोष बालपांडे उपस्थित होते.विस्तार अधिकारी विभावरी पडोळे यांनी डिजीटल शिक्षण प्रणालीचे उपयोग व फायदे सांगितले. चलचित्राद्वारे होणारे हे शिक्षण उच्च प्रतीचे साधन असून शिक्षकांच्या जबाबदारीत एक वैज्ञानिक भर पडल्याचे सांगितले. यामुळे शिक्षकांना सहज व आकर्षक पद्धतीने शिक्षण देता येईल, असे प्रतिपादन केले.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला गतवर्षी जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक मिळाला होता. त्यात मिळालेले पैशाचा वापर शैक्षणिक साधनासाठी करून डिजीटल क्लास रूम निर्मिती ही मुख्याध्यापक मनोहर कारेमोरे यांचया पुढाकाराने व सरपंच रामेश्वर कारेमोरे व सहकारी सहायक शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आली. युवराज सेलोकर यांनी शासकीय उपक्रमाचा विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घेऊन गावाच्या विकासात यागदान देण्याचा प्रयत्न करावा. संचालन विजया हटवार, प्रास्ताविक मनोहर कारेमोरे व आभार कुसुमलता वाकडे यांनी मानले. कार्यक्रमास सुनंदा सार्वेे, रेखा माकडे, राधेश्याम ठवकर, विद्या लिल्हारे, अर्चना बालपांडे, वनिता वैद्य, हिनावती कुंभलकर, भूमिका हटवार, रंजना ठोंबरे, गीता बालपांडे, कविता गजभिये, पी.एन. बारई, शीतल बांगडकर, रसिका माकडे, किसनाबाई अहिरकर, रामरतन शेंडे, नाशिकराव बारसागडे, श्याम ठवकर, पुरूषोत्तम तितीरमारे, ज्ञानेश्वर किरपाने व उमेश बालपांडे उपस्थित होते. (वार्ताहर)
डिजीटल शिक्षण प्रणाली सर्वाेत्तम माध्यम
By admin | Updated: November 22, 2014 00:18 IST