शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव एक गणपती’ गावाला मिळणार योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:22 IST

गणेशोत्वाचा सण साजरा करतांना 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबविणाºया गावांना शासनाच्या सर्व वैयक्तिक व सामुहिक योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार असल्याची .....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : प्रदूषणास आळा घाला, डिजे मुक्त उत्सव साजरा करा, जातीय सलोखा समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गणेशोत्वाचा सण साजरा करतांना 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबविणाºया गावांना शासनाच्या सर्व वैयक्तिक व सामुहिक योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. गणेश मंडळाला प्राप्त वर्गणी मधून शेतकºयांना मदत, जलसंवर्धन, स्वच्छता अभियान व बेटी बचाओ अभियान या सारखे सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित जातीय सलोखा समिती बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविशेखर धकाते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, अर्चना मोरे, उपअधिक्षक (गृह) एस.व्ही. कुळकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, प्रभाकर टिकस, श्रीकांत डिसले उपस्थित होते.शांतताप्रिय उत्सवाची जिल्ह्याची परंपरा कायम ठेवा असे आवाहन करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, ईद व गणेशोत्सव एकत्र येत असल्याने उत्सवाला गालबोट लागेल असे काही घडू देवू नका. उत्सवादरम्यान सलोख्याचा उत्सव आपण सर्व साजरा करु या. महिलांची सुरक्षितता, मुतीर्ची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबतीत तडजोड केली जाणार नाही. जे सांगून एकतील त्यांना प्रशासन समजावून सांगेल, जे ऐकणार नाहीत त्यांना कायदेशिर कार्यवाहीला समोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.गणेश मंडळाकडून चांगल्या व विधायक कायार्चीच अपेक्षा आहे. ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी गणेश मंडळाने घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मुर्ती न बसविता शक्कतो शाळूच्या मातीच्या मुर्ती बसविण्यात याव्यात. एक गाव एक गणपती, एक वार्ड एक गणपती या साठी शांतता समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. एक गाव एक गणपती राबविणाºया गावात शासनाच्या सर्व योजना प्राधान्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मयार्देबाहेर होणाºया आवाजामुळे कर्णबधिरता व कानाचे आजार मोठया प्रमाणात होतात. ही बाब गणेश मंडळाने प्रकषार्ने टाळावी व हा गणेशोत्सव डिजे मुक्त गणेशोत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव व ईद एकत्र येत असल्यामुळे जातीय सलोखा आबाधित असल्याचे दाखवून देण्याची ही संधी असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी सांगितले. गणेशोत्सव व इद दरम्यान दोन्ही समाजात ताण तणाव वाढणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे त्या म्हणाल्या. यावर्षी शासनाने उत्कृष्ट गणेश मंडळासाठी पुरस्कार जाहिर केले आहे असे सांगून साहू म्हणाल्या की, गणेश मंडळांनी धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. जे मंडळ बॅनर, पोस्टर्स छापतील त्यावर प्रिंटरचे नाव असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.शाळा महाविद्यालय, रुग्णालय अशा ठिकाणी आवाजाची मयार्दा पाळण्यात यावी. शक्यतो डि.जे. मुक्त उत्सव साजरा करावा. या उत्सवादरम्यान मुलांच्या परीक्षा येत असून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आवाजाचा थेट परिणाम कर्ण बधिरतेवर होत असून ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ध्वनी विरहित उत्सव ही संकल्पना अमलात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. सोशल मिडियाचा वापर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.नगराध्यक्ष सुनिल मेंढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेश उत्सव साजरा होणे आवश्यक आहे. उत्सवादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही. जबाबदारी आपली असून जातीय सलोखा अबाधित राहिल असा उत्सव साजरा करण्यात यावा. यावेळी विविध तालुक्यातील सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. यावषीर्चा गणेशोत्सव व ईद सामाजिक एकोपा व ऐक्याचे प्रतिक राहील.