शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘सिकलसेल’ग्रस्तांना मोफत बससेवेचा लाभ

By admin | Updated: March 23, 2015 00:48 IST

सिकलसेलग्रस्त व्यक्तीला व त्याच्यासह एकाला आता रापमच्या बसमध्ये मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

भंडारा : सिकलसेलग्रस्त व्यक्तीला व त्याच्यासह एकाला आता रापमच्या बसमध्ये मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाने १० मार्चला अध्यादेश काढला असून तसे निर्देश राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहे.विदर्भातील अनेक जिल्ह्यात सिकलसेल रूग्णांची मोठी संख्या आहे. लगतच्या गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात सिकलसेलग्रस्तांची मोठी संख्या आहे. त्यातुलनेत भंडारा जिल्ह्यात रूग्णांची संख्या अल्प असली तरी, या योजनेचा लाभ त्यांनाही मिळणार आहे. ५ फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सिकलसेल रूग्णांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करताना कुठलाही शुल्क आकारला जावू नये याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावरून सार्वजनिक आरोग्य विभागाने १० मार्चच्या पत्रानुसार एसटी बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या सिकलसेलग्रस्तांना मोफत प्रवास सुविधा मिळणार आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे सिकलसेलग्रस्त असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. किंवा रूग्णाजवळ जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र नसल्यास रक्तपेढीकडून मिळालेले प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाणार आहे. ही मोफत सेवा ३१ मार्च २०१७ पर्यंतच मिळणार असल्याचा उल्लेख या आदेशात आहे. सिकलसेल ग्रस्तांना औषधोपचारासाठी अनेकदा जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयात खेटा घालाव्या लागतात. रूग्णांना औषधोपचार करण्यासाठी राज्य शासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (शहर प्रतिनिधी)