शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मरणोपरांत ‘आत्माराम’ पाहणार सुंदर जग

By admin | Updated: October 29, 2016 03:24 IST

‘मरावे परि कीर्ती रूपी उरावे’ अशी म्हण आपल्याकडे आहे. त्या ऐवजी आता ‘मरावे परि नेत्ररूपी उरावे’ असेच आता म्हणायला हवे.

समाजासमोर आदर्श : नेत्रदानाचा संकल्प काळाची गरजभंडारा : ‘मरावे परि कीर्ती रूपी उरावे’ अशी म्हण आपल्याकडे आहे. त्या ऐवजी आता ‘मरावे परि नेत्ररूपी उरावे’ असेच आता म्हणायला हवे. याचा प्रत्यय जिल्हा सामान्य रूग्णालयात आला. आत्माराम लांजेवार यांनी मरणोपरांत नेत्रदान करून अवयवदान चळवळीच्या माध्यमातून मरणानंतरही हे सुंदर जग ते पाहणार आहेत. नेत्ररूपी उरण्याच्या त्यांच्या या कृतीमुळे गरजू अंध व्यक्तीला त्यांच्या डोळ्याने जग पाहण्याचे भाग्य लाभणार आहे. मृत्युनंतर डोळ्याचा उपयोग दुसऱ्या अंध व्यक्तीला जग पाहण्यासाठी होत असेल तर दृष्टिची अमुल्य भेट देऊ या उद्दात्त हेतूने अंध व्यक्तीच्या जीवनातील अं:धकार दूर करण्याचे पवित्र काम भीमराव आत्माराम लांजेवार रा. झाडेगाव ता. साकोली यांनी आपल्या वडिलांचे आत्माराम लांजेवार यांचे मरणोपरांत नेत्रदान करून वडिलांना या जगात जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला.आत्माराम नत्थूजी लांजेवार (७५) वर्ष हे झाडगाव येथील रहिवासी असून ते मोलमजूरीचे काम करत होते. रक्तदाबाच्या त्रासामुळे त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान २७ आॅक्टोंबरला रूग्णालयात त्यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांचा मुलगा भीमराव लांजेवार यांना नेत्रदानाची माहिती दिली असता नेत्रदान या महान कार्याकरीता ते तयार झाले.भारतात दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक नेत्रपटलाची आवश्यकता असून सध्या केवळ ५० हजार नेत्रपटले नेत्रदानाद्वारे उपलब्ध होतात. भारतात दरवर्षी एक कोटीच्या जवळपास लोक या ना त्या कारणाने मृत्युमुखी पडतात. या सर्व मानवी मृतदेहांना अग्नी देऊन जमिनीत पुरून किंवा अन्यप्रकारे अंत्य संस्कार केले जाते. मृतदेह नष्ट करताना मौल्यवान असे अंधाना दृष्टि देऊ शकणारे नेत्रही नष्ट केले जातात. आपले हे मौल्यवान डोळे इतरांच्या उपयोगी आणायचे असल्यास किंवा मृत्युनंतर अवयवदान करावयाचे असल्यास जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्रविभागात संपर्क साधता येऊ शकतो.कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणांमुळे अंधत्व येऊ नये आणि जर आलेच तर अशा व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे काळाची गरज असल्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते, नेत्र शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण फेगडकर यांनी केले आहे. यावेळी नेत्र चिकित्सा अधिकारी अजय आगाशे व शेंडे यांनी नेत्र संकलनाची प्रक्रिया पार पाडली असून समुपदेशनाचे कार्य सोनाली लांबट यांनी पार पाडले. (जिल्हा प्रतिनिधी)