शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

हिरव्या कडुनिंबावर बहरले सौंदर्य

By admin | Updated: May 9, 2015 00:42 IST

साधारणत: मार्च-एप्रिल महिन्यात कडूनिंबाच्या झाडाला फुलोरा येतो. पांढरा, पिवळसर फुलोरा हिरव्या शालूवर अधिकच....

पर्यावरण रक्षक कडूनिंब : फुलोरा करतोय मोहीतलाखांदूर : साधारणत: मार्च-एप्रिल महिन्यात कडूनिंबाच्या झाडाला फुलोरा येतो. पांढरा, पिवळसर फुलोरा हिरव्या शालूवर अधिकच खुलून दिसतो. येणाऱ्या-जाणाऱ्याला मोहिनी घालतो. कडूनिंबाचे वैशिष्ट्य म्हणजे तो ग्रीष्म ऋतूत अर्थात भर उन्हाळ्यात हिरवाकंच असतो. ‘हिरव्या कडूनिंबाच्या डोई, कुणी खोविला गजरा, पिवळसर, पांढऱ्या फुलांनी, दिसे खुलुनी साजरा, एक अनोखे लावण्य, चित्त घेतले वेधून’. या ओवी प्रतिभावंत कवी प्रल्हाद बोरकर यांच्या काव्यपंक्तीची आहेत. अशी अनुभूती सध्या आपल्या अवती-भवती फुललेले कडूनिंबाचे झाड देत आहे. वसंत ऋतूत हिरवागार शालू परिधान केलेला, सर्वत्र फुललेला व सर्वांना आकर्षित करुन संपूर्ण परिसर प्रदूषणविरहित करणारा वृक्ष म्हणजे ‘कडूनिंब’ होय.त्याचे वास्तव्य खेड्यापाड्यात रानावनात सर्वत्र आढळते. खेड्यांमध्ये तर उन्हाळ्यात कडूनिंब हा ग्रामस्थांचे खास विश्रांतीचे ठिकाण असतो. या झाडाची साल गर्द रंगाची, चिरा पडलेली असून पाने लांब, हिरवी, कोवळी व चवदार असतात. याची फुले पिवळसर रंगाची व लहान परंतु दाट झुबक्यांनी ओथंबलेली फांद्यांच्या अगदी टोकाला येतात.कडूनिंब हा वातावरण शुद्ध ठेवतो, प्रदूषणाशी लढा देतो. आपल्या दातांचे रक्षण करतो, चेहऱ्यावरील मुरुमावर इलाज करतो. कडूनिंबाचा काढा पिल्याने हाडातील ताप दूर होतो. कडूनिंबाच्या निंबोळीपासून तेल काढण्यात येते. त्यापासून साबण तयार केली जाते. मुखशुद्धीसाठी कडूनिंबाची काडी वापरली जाते. खरुज, गजकर्ण, पित्ता कावीळ, दात दुखणे, मधुमेह आदी आजारांच्या उपचारासाठी कडूनिंब लाभदायक ठरणारा आहे. (तालुका प्रतिनिधी)आयुर्वेदात महत्त्व कडूनिंबाच्या वृक्षाला आयुर्वेदात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या झाडाची पाने, बिया, साल, काड्या, निंबोळ्या आदी औषधी रूपाने मानवाच्या बहुपयोगी आहेत. कडूनिंब डोक्यातील कोंडा आणि उवांपासूनही मुक्ती देतो. त्वचेला आराम देतो. त्वचेचे रक्षण करतो. रक्ताचे शुद्धीकरण करतो. कडूनिंबाची साल रसयुक्त करुन प्राशन केल्यास पोटाचे विकार, अंगातील ताप, उलटी होणे आदींपासून संरक्षण मिळते. काविळ आजारावरही कडूनिंब गुणकारी आहे.