शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या एकतेसाठी सज्ज राहा

By admin | Updated: August 11, 2014 23:45 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी सुरू आहे. त्यामुळे मुळनिवासी समाजाने धनगर समाजाच्या या षडयंत्रविरूद्ध त्यांना प्रतिकार करण्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी

भंडारा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी सुरू आहे. त्यामुळे मुळनिवासी समाजाने धनगर समाजाच्या या षडयंत्रविरूद्ध त्यांना प्रतिकार करण्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी सज्ज राहून समाजाच्या एकजुटतेसाठी सज्ज राहा, असे आवाहन प्रादेशिक समाज कल्याण आयुक्त आर.डी. आत्राम यांनी केले आहे.येथील जिल्हा परिषद सभागृहात जागतिक (आदिवासी) दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आत्राम उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरिल उद्गार काढले. यासोबतच समाज जागृती व उत्थानासाठी वेळ, पैसा, श्रम आणि बुद्धीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.राजकुमार हिवारे होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण आयुक्त आर.डी. आत्राम, प्रा.वामन शेळमाके, माजी नगराध्यक्षा वर्षा धुर्वे, डॉ.किशोर कुंभरे, महिला व बालकल्याण सभापती जिल्हा क्रिडा अधिकारी ए.बी. मरस्कोल्हे, जि.प. सदस्य राजू सय्याम, अशोक उईके, ऋषी युवनाते, गणपत मडावी, ज्ञानेश्वर मडावी, गौरीशंकर सलामे, विष्णू मडावी, प्रभा पेंदाम आदी उपस्थित होते.यावेळी प्रा.हिवारे म्हणाले, धनगर ही जात असून जमात नाही. त्यामुळे संवैधानिक तरतुदीनुसार ही जात अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करता येत नसल्याचे सांगितले. यावेळी आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अशोक उईके, पुनम मरस्हकोल्हे, अश्विनी कोसरे, उच्च माध्यमिक परीक्षेतील वसुंधरा येरकडे, ज्योती पुसाम, गुरूदेव मडावी तर पदवी परीक्षेतील युनित धुर्वे, रवीन्द्र मडावी यांच्यासह गणपत मडावी, अजाबराव सहाये, मुरलीधर धुर्वे, जगन्नाथ वाढीवे आदींचा सत्कार करण्यात आला. सभेत जागेश बांगर, ए.बी. मरस्कोल्हे, रेखा भुसारी, राजु सय्याम, वामन शेळमाके, डॉ.किशोर कुंभरे, प्रा.विजया पाटील, अर्जुन मरस्कोल्हे, गोवर्धन कुंभरे, प्रभा पेंदाम, ज्ञानेश्वर मडावी आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागेश कळपते, नरेश मडावी, कामेश कल्लो, संदीप उईके, राहुल पेंदाम, बालेश वरकडे, मनोज वरकडे, सुमित वरकडे, राकेश प्रत्येके, दिनेश ईस्कापे, करूणा इळपाते, जयश्री जगनाके, करूणा उईके, रवि मडावी, राम आहाके, रवि पंधरे आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)