व्यथा जिल्हा सामान्य रूग्णालयाची : कचऱ्याने माखलेल्या नाल्याइंद्रपाल कटकवार भंडारादहा रूपयांची चिठ्ठी काढून उपचार करून घेणाऱ्या हजारो रूग्णांचे आरोग्य गलिच्छ व दुर्गंधीयुक्त वातावरणाने धोक्यात येवू शकतात, असे कुणी म्हटल्यास त्यावर विश्वास होणार नाही. परंतु हे शक्य आहे. कुणाला विश्वास बसत नसेल तर जिल्हा रूग्णालय परिसराची पाहणी केल्यावर कदाचित हे कटू सत्य पचविता येईल. आरोग्य निदानासाठी गरिबांचे आधारवड असलेल्या जिल्हा रूग्णालय दुर्गंधीच्या सावटात सापडले आहे. महिला रूग्णालयाची निर्मिर्ती केव्हा होईल याचा थांगपत्ता नाही. अशात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ३३, दोन उपजिल्हा रूग्णालय, शंभरपेक्षा जास्त उपआरोग्य केंद्रानंतर जिल्हा रूग्णालयात ग्रामीणांची सर्वात जास्त गर्दी पाहायला मिळते. सकाळी ८ वाजता बाह्य रूग्ण विभाग सुरू होताच सातही तालुक्यातून येणाऱ्या ग्रामीण रूग्णांची एकच झुंबड होते. सध्या विषाणुजन्य तापाची साथ असल्याने रूग्णांची तोबा गर्दी आहे. आबालवृद्धांची संख्या जास्त आहे. बाह्य रूग्ण विभागासह जिल्हा शल्य चिकीत्सकांचे दालन असलेल्या इमारतीकडे जात असलेल्या रस्त्याच्या कडेला मागील काही महिन्यांपासून नालीचे बांधकाम होत आहे. नालीचे खोदकाम व बांधकाम अपूर्णावस्थत असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. ऊन सावलीच्या खेळात डासांच्या उत्पतीला पोषक वातावरण असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. कुंटुंब कल्याण केंद्राच्या बाुजने नेत्र रूग्ण विभागाकडे जाणाऱ्या मार्गाचे अवलोकन केल्यास याची प्रचिती येईल. तोंडावर रूमाल घेऊन जाण्यापलिकडे पर्याय नसताना रूग्ण व नातेवाईकांना नाईलाजास्तव तिथून रहदारी करावी लागते. गटारे व नाल्यांची अवस्था किळसवाणी झाली आहे. त्यातल्या त्यात पॉलिथीनचा कचरा, रूग्णालयातील फेकलेले काही वेस्टेज मटेरियल, उघडी असलेली गटारे, वाढलेल्या जंगली वनस्पती आजारांना खतपाणी घालत आहे. नेत्र चिकीत्सा विभागासमोर पाणीच पाणी साचलेल्या तेथील रूग्णांची गैरसोय होत आहे.
गरिबांचे आधारवड दुर्गंधीच्या सावटात
By admin | Updated: August 11, 2016 00:24 IST