शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर महिला सरपंचाला एक वर्षाची शिक्षा

By admin | Updated: January 22, 2017 00:17 IST

घरकूल मंजूर करण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंचाला अटक केली होती.

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्वाळा : साकोली तालुक्यातील गुढरी येथील प्रकरणभंडारा : घरकूल मंजूर करण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंचाला अटक केली होती. याप्रकरणी विद्यमान विशेष न्यायाधीश - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी आज लाचखोर सरपंचाला एक वर्षाची शिक्षा ठोठावली. सकोली तालुक्यातील गुढरी येथील महिला सरपंच शालीना राजप्रकाश खांडेकर (३५) रा. सराटी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. सदर प्रकरण २३ आॅक्टोबर २०१० चे आहे. साकोली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत गुढरी येथील देवानंद सुदाम ईलमकर (४०) यांना घरकुलची आवश्यकता होती. त्यामुळे देवानंद यांनी सरपंच शालीना खांडेकर यांना घरकुल मंजूर करून देण्याची गळ घातली. यावर सरपंच यांनी देवानंदला १००० रूपयाची मागणी केली. मात्र लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे सदर महिला सरपंचाविरूध्द तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून एक हजार रूपयांची लाच स्विकारताना महिला सरपंच शालीना खांडेकर यांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी त्यांच्याविरूध्द साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तत्कालीन पोलीस उपअधीक्षक वासुदेव सुर्यवंशी यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यात विद्यमान विशेष न्यायाधीश - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी सर्व साक्षपुरावे तपासले. यात सरपंच शालीना खांडेकर या दोषी आढळून आल्या. याप्रकरणी न्यायाधीश पांडे यांनी आरोपी महिला सरपंच यांना कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक वर्षाची शिक्षा तसेच १००० रूपये दंड. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा तसेच कलम १३ (१) (ड) सहकलम १३ अन्वये एक वर्षाची शिक्षा तसेच एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील टवले यांनी मांडली. (शहर प्रतिनिधी)