शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

बाबा जुमदेवजींनी व्यसनमुक्त समाज घडविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 00:29 IST

मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांनी व्यसनाधीन, तणावग्रस्त, पीडित जनतेला दु:ख निवारण्याचा मार्ग दाखविला.

परिणय फुके : कोंढा येथे परमात्मा एक सेवक संमेलनकोंढा (कोसरा) : मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांनी व्यसनाधीन, तणावग्रस्त, पीडित जनतेला दु:ख निवारण्याचा मार्ग दाखविला. मानवाला जागृत करण्यासोबतच धर्माचे रक्षण आणि समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त केले. अशा थोर विचारांच्या बाबा जुमदेवजींच्या जन्मदिनी शासकीय सुटी जाहीर व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले. कोंढा (कोसरा) येथे परमात्मा एक सेवक मंडळातर्फे बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते मांगो लिचडे हे होते. यावेळी अतिथी म्हणून आमदार डॉ.परिणय फुके, चेतन भैरम, मार्गदर्शक रामकृष्ण जांभुळकर, दामोधर जिभकाटे, बंडू लक्षणे, अर्जुन भुरे, रामेश्वर बिलवणे, भोजराम लांजेवार, आसाराम माहुरे, मंगल चावरे, हरिश्चंद्र गवळी, पंचायत समिती सदस्या कल्पना गभणे, इस्तारी काटेखाये, गणपत भांडारकर, शंकर वैद्य उपस्थित होते. यावेळी डॉ.फुके यांनी आमदार निधीतून परमात्मा भवनासाठी दहा लाख रूपये जाहीर केले. मार्गदर्शक दामोधर जिभकाटे यांनी बाबा जुमदेवजी यांनी तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती केली. त्यानंतर समाजातील सर्वांना सोबत घेऊन कार्य केले. सर्वांनी भेदभाव न करता कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. जन्मोत्सवानिमित्त कोंढा (कोसरा) येथे ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये सेवकांनी लेझीम नृत्य, झॉकी देखावे काढले. प्रास्ताविक विनोद भुरे यांनी केले. संचालन जयदेव गिरडकर यांनी तर आभारप्रदर्शन रामेश्वर बिलवणे यांनी केले. रात्री बाबांच्या जीवनावर आधारित आॅर्केस्ट्रा पार पडला. त्यानंतर विनोद भुरे दिग्दर्शित संगीत फळ कर्माचे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी चंदू कुर्झेकर, प्रकाश कुर्झेकर, राहुल सेलोकर, बंडू जांभुळकर, किशोर बिलवणे, वासुदेव जिभकाटे, हरी जांभुळकर, विलास हटवार, भोला सेलोकर, महेश जिभकाटे, कैलाश वंजारी, गंगाधर रेवतकर, सुरेश बावनकर, सुनिल भिवगडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)