शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांची फसवणूक करणारा ठकबाज अटकेत

By admin | Updated: July 18, 2016 01:26 IST

वनविभागात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायम नोकरीत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय झालेला आहे,

पवनी पोलिसांची वर्धेत कारवाई पवनी : वनविभागात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायम नोकरीत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय झालेला आहे, अशी खोटी बतावणी करुन सन २०१४ मध्ये शंभरावर युवक-युवतींना लक्षावधी रूपयांनी गंडविणाऱ्या वर्धेचा मास्टरमार्इंड जुगल किशोर चव्हाण (५३) याला तब्बल चार महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे. वनविभागात वनरक्षक, वनपाल, वाहनचालक या पदावर कायम करण्याची हमी देवून दोन वर्षापूर्वी भंडारा जिल्ह्यातील शंभरावर बेरोजगार युवक- युवतीकडून २ लक्ष अग्रीम रुपये घेतले. यात या बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या जुगल किशोर चव्हाण (५३) रा. वर्धा, अशफाक अली अजगर अली (५०) रा. पद्मा वार्ड पवनी व रविंद्र मधूकर डिब्बे रा. गोसेखुर्द यांचे विरुध्द पवनी पोलिसात मार्च २०१६ मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती. प्रकरणाचा तपास संथगतीने सुरु होता. फिर्यादी दीपक सत्यवान साखरे (३४) रा. गोसे यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली होती. तपासाला गती देण्यात आली. अखेर पोलीस उपनिरीक्षक गदादे यांच्या नेतृत्वात पोलिसांची चमू वर्धेला दाखल झाली. जुगल किशोर चव्हाण हा घराबाहेर बाहेर जात असताना पकडण्यात आले. फिर्यादी दीपक साखरे रा. गोसे यांनी २७ जुलै २०१४ रोजी जुगल किशोर चव्हाण, अशफाक अली अजगर अली व रविंद्र डिब्बे यांचेकडे सहा लाख रुपये रोखीने दिले. त्यावेळी प्रतिक्षा यादीमध्ये तुमचा नंबर लागेल. त्यानंतर प्रशिक्षणाला जावे लागेल असे रक्कम घेतल्यानंतर सांगण्यात आले. काही दिवसानंतर ४५ व्या क्रमांकावर नाव असलेली यादी व बनावट आदेश तक्रारकर्त्याला देण्यात आली. हा आदेश पाहून उर्वरित युवक युवतींनी ठरल्यानुसार पूर्ण रक्कम संबंधिताकडे दिली पंरतु कोणालाही नियुक्ती आदेश प्राप्त झाले नाही. त्यानंतर दीपक साखरे यांच्याकडे असलेला आदेश व प्रतीज्ञा यादीची प्रत वनविभागाचे अधिकाऱ्यांना दाखविली असता आदेश व प्रतिक्षा यादी बनावट असुन असा कोणताही शासन निर्णय किंवा त्यानुसार नियुक्त्या होणार नाहीत, हे समजले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच मार्च २०१६ मध्ये पवनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. १६ जुलै रोजी पवनी पोलिसांनी चमू वर्धेला रवाना झाली. त्यांनी प्रमुख आरोपी जुगल किशोर चव्हाण यास अटक केली. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अन्य दोन आरोपींच्या शोधात आहेत. (तालुका प्रतिनिधी)