शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

समयसूचकतेने फसला अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: August 3, 2015 00:27 IST

तुझ्या आईची प्रकृती बरी नाही. तुला बोलाविले असे सांगून एका अनोळखी इसमाने रवियाचे हात पकडून ओढत असताना..

तुमसर : तुझ्या आईची प्रकृती बरी नाही. तुला बोलाविले असे सांगून एका अनोळखी इसमाने रवियाचे हात पकडून ओढत असताना बाजूला असलेल्या फिजाने समयसूचकता दाखवून त्या इसमाच्या हाताला जोरदार चिमटा घेतला व त्याच्या तावडीतून सुटका करुन घराकडे पळ काढला. ही घटना ३१ जुलैला सकाळी १० वाजता सुमारास फ्रुट मार्केटजवळ घडली.रविया अंजुम शकिल मालाधारी ही इयत्ता ५ वी तर फिजा सलाम शेख इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी असून त्या दोन्ही येथील शारदा विद्यालयात शिकत आहेत. ३१ जुलै २०१५ रोज शुक्रवारला स्थानिक शारदा विद्यालय तुमसर येथे नागपूर बोर्डचे इयत्ता १० वीचे पेपर सुरु असल्यामुळे सकाळपाळीत शाळा सुरु आहे. त्यामुळे ९.४५ वाजता शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. वर्ग ५ मध्ये शिकत असलेली रविया फिजा या दोघी विद्यार्थ्यांनी घराच्या दिशेने जाण्यास निघाल्या. दरम्यान तुमसर येथील फ्रुट मार्केटजवळ पोहचताच एका अनोळखी इसम रवियाचा हात पकडून तुझ्या आईची प्रकृती बरी नाही, घरी बोलाविले, असे म्हणून रवियाचा हात ओढत ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना रवियाने नकार देत तिने विरोध करताच सोबत असलेल्या फिजाने त्या अनोळखी इसमाच्या हाताला जोरदार चिमटा घेतला व रवियाला त्याच्या तावडीतून सोडवून घाबरलेल्या स्थितीत त्यांनी घराकडे पळ काढल्याने तो इसम पसार झाला. मुली घरी पोहोचताच त्यांनी पालकांना आपबिती सांगितली. दोन्ही मुलींच्या पालकांनी तुमसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. मुलींना आरोपीचे वर्णन विचारले असता त्यांनी आरोपी ४५ ते ५० वयोगटातील असून तो काळा पँट व काळीच बनियान घातलेला होता, असे सांगितले. शुक्रवारी मार्केट बंद असल्याने त्या मार्गावर रहदारी कमीच असल्याची संधी त्या अनोळखी इसमाने संधी साधली असावी. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी चौकशी सुरु केली असून त्या इसमाचा शोध घेणे सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)