शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचावर महिला सदस्यांचा हल्लाबोल

By admin | Updated: August 2, 2014 23:55 IST

देव्हाडी ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत महिला सरपंच व तीन महिला ग्रामपंचायत सदस्यात विषयाला धरुन प्रथम शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर पाण्याचा ग्लास महिला सरपंचाच्या अंगावर भिरकाविला.

देव्हाडी येथील प्रकार : पोलिसात तक्रार दाखलतुमसर : देव्हाडी ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत महिला सरपंच व तीन महिला ग्रामपंचायत सदस्यात विषयाला धरुन प्रथम शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर पाण्याचा ग्लास महिला सरपंचाच्या अंगावर भिरकाविला. सरपंचाच्या टेबलवरील लाकडी ठोकळा डोक्यावर मारताना तो सुदैवाने हुकला अन्यथा अनर्थ घडला असता. याप्रकरणी सरपंच सुनीता बिरणवारे यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.३० जुलै रोजी देव्हाडी ग्रामपंचायतीची मासिक सभा ग्रामपंचायतमध्ये आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता राजकुमार बिरणवारे होत्या. सभेत ग्रामपंचायत सदस्य गीता धर्मेंद्र बन्सोड, रंजना नागपूरे, रिता चैनलाल मसरके यांनी प्रश्न मांडला. विषयाला धरुन प्रश्न उपस्थित करा. बाहेरचे मुद्दे येथे उपस्थित करु नका असे सरपंच बिरणवारे यांनी तिनही महिला ग्रामपंचायत सदस्यांना सांगितले. यावरुन सभेत वाद व गोंधळ सुरू झाले. प्रथम शाब्दीक चकमक व नंतर टेबलवरील पाण्याने भरलेला ग्लास सरपंच बिरणवारे यांचे दिशेने भिरकावला. त्यानंतर टेबलवरील नावाचे लाकडी ठोकळा सरपंच यांच्या डोक्यावर मारताना सुदैवाने तो हुकला. यासोबतच शिवीगाळ केले. यासंदर्भात सरपंच बिरणवारे यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तीन महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात तक्रार नोंदविली. तुमसर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणी तीनही ग्रामपंचायत सदस्यांचे बयान नोंदविले. या प्रकरणाची आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे सरपंच बिरणवारे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)