शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नगर पंचायतवर हल्लाबोल

By admin | Updated: July 29, 2016 00:38 IST

मोहाडी येथील नळाला येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे....

मोहाडीत दूषित पाण्याचा पुरवठा : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पुढाकार मोहाडी : मोहाडी येथील नळाला येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंबधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोहाडीतर्फे नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी उपस्थित नगराध्यक्ष स्वाती निमजे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मात्र यावेळी एकही अधिकारी उपस्थित नव्हते. सध्या मोहाडीतील नळांना पिवळा गढूळ व दूषित पाणी येत असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांना हातपंपाचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच शहरात सार्वजनिक खुल्या जागेत तसेच रस्त्याच्या कडेला हिरवेगार गवत वापरलेले आहे. या गवतामुळे डासांचा त्रास वाढलेला असून सरपटणारे प्राणी, साप वैगेरे गवतात लपून असतात. ज्यामुळे प्राणहानी होण्याची शक्यता असल्याने या गवतावर तननाशकाची फवारणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याणीताई भुरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष सोमल गजभिये, राकाँ महिला शहर अध्यक्ष मनिषा गायधने, रामदास पराते, किशोर पातरे, रूबीना शेख, ज्योती माहालगावे, नुरजंहा शेख, कौशल्याबाई निखारे, जयश्री गायधने, मंजुषा भानारकर, वनीता पारधी, कविता गजभिये, बाळु तरारे, प्रमोद भानारकर, देवकाबाई पारधी, महेश पारधी, कपील पारधी, थगबागडे, आकाश डेकाटे, विपुल भानारकर, असलम पठाण, इमरान पठाण, संदेश लोणारे, धनराज तरारे, जितु सोनवाने, महेंद्र पारधी, कदीर शेख, मोहित पारधी, शंकर भुते, शैलेश मेंढे, मिनाझ शेख, दानीश शेख, लकी शेख, आफताब कुरेशी, पंकज निमजे, वैभव डोंगरे, प्रणय सोनकुसरे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपंचायत मोहाडी येथे लेखापाल चौधरी व अभियंता नागदेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हे दोन्ही अधिकारी आठवड्यातून फक्त दोनच दिवस मोहाडी येथे येतात व फक्त एक दोन तास थांबून निघुन जातात. त्यामुळे नागरिकांना आठ दहा दिवसांची वाट बघावी लागते. नगरसेवकांना सुद्धा त्यांची वाट पाहात थांबावे लागते. या अधिकाऱ्यांनी ठरलेल्या दिवशी संपूर्ण दिवसभर येथे उपस्थित राहावे, अशी मागणी आहे. पाण्यासारख्या ज्वलंत मुद्यावर नगरपंचायत प्रशासन गंभीर नाही, अशी चर्चाही शहरात सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)