शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला संघटनांचा पाठिंबा

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

कालपासून बाबा खंताळू माध्यमिक आश्रमशाळा, गोसे बुज येथील कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे वेतनाच्या मागणीसाठी..

भंडारा : कालपासून बाबा खंताळू माध्यमिक आश्रमशाळा, गोसे बुज येथील कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे वेतनाच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण भंडारा यांच्या कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा कार्यालयाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदने देवून त्यांना वेतन देण्याची मागणी करण्यात आली पण या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला राज्य आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघाचे राज्य अध्यक्ष माणिकराव अंधारे, सरचिटणीस गोविंदा गुंजाळ, कॉलेज आश्रमशाळा कृती समिती, म.रा. राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह पवार, बाबा साहेब नाईक आश्रमशाळा कनिष्ठ महा. पातुर अकोला आदी संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गोसीखुर्द धरणाच्या प्रकल्पग्रस्त गावात असलेल्या या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना १२ महिन्यापासून शासन वेतन न देवून त्यांना वेठीस धरत आहे. या आंदोलनास गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी आपले समर्थन घोषित केले आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल न घेतल्यामुळे कर्मचारी क्षुब्ध झाले असून सर्व संघटनांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)