शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक वनसंरक्षकांचा शेतकऱ्यांच्या खसऱ्याला ठेंगा

By admin | Updated: August 4, 2016 00:35 IST

शेतकऱ्याचे खसरे प्रकरणाला नाकारून कंत्राटदारांच्या खसरे प्रकरणाला क्लीन चिट देणारे साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे शेतकऱ्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत.

कंत्राटदाराच्या खसऱ्याला मिळते ‘क्लीन चिट’ : लाखांदूरातील शेतकऱ्यांची वनमंत्र्यांकडे तक्रारलाखांदूर : शेतकऱ्याचे खसरे प्रकरणाला नाकारून कंत्राटदारांच्या खसरे प्रकरणाला क्लीन चिट देणारे साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे शेतकऱ्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत. नाहक शेतकऱ्यांना त्रास देऊन कंत्राटदारांच्या मर्जीने काम करीत आहेत, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी राज्याचे वन तथा वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. गत पाच महिन्यांपासून लाखांदूर वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयातील तीन वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची बदली झाली. याच कालावधीत सहायक वनसंरक्षक साकोली हे मात्र कायम असल्याने खसरे प्रकरणात सावळागोंधळ करण्यासाठी त्यांना चांगलेच जमले. लाखांदूर वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयात नोव्हेबर २०१५ पासून शेतकरी व कंत्राटदाराचे खसरे प्रकरण अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे रखडले. परंतु यात कंत्राटदारांचे प्रकरण पटकन पास करून शेतकऱ्यांचे प्रकरण एक ना अनेक त्रृट्या पुढे करून साकोली कार्यालयात रेंगाळत ठेवण्यात आले. खसरे प्रकरणाच्या फाईली लाखांदूर ते साकोलीत अजूनही फिरत आहेत. तोडलेली लाकडे शेतात पडून आहेत काही शेतकऱ्यांनी तोडलेली लाकडे पावसाच्या व चोरीच्या भीतीने सुरक्षित स्थळी आणून ठेवली. आज ना उद्या साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे पासिंग करून देतील म्हणून काही शेतकऱ्यांनी आपली शेती पडीक ठेवून खरिपाची पीक न घेता आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकऱ्यानी स्वत: केलेल्या खसऱ्याचे प्रकरण पुन्हा पाच ते सहा महिने फाईल बंद ठेवा. कंत्राटदारांचे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचे फर्मान साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षकानी काढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील ७ ते ८ माहिन्यांपासूनचे खसरे प्रकरणाची तपासणी केली असता एकही शेतकऱ्याचे स्वत: केलेले प्रकरण निकाली निघाल्याचे दिसून येत नाही. मात्र कंत्राटदारांचे संपूर्ण प्रकरण कमिशनपोटी तात्काळ निकाली निघाल्याचे तपासात दिसून येते. यापुर्वी पास केलेले खसरे प्रकरणाची झाडाच्या बुंध्यासकट मोजणी केली असता अवैध वृक्ष कटाईचे मोठे घबाड उघडकीस यायला वेळ लागणार नाही. जंगलातील चोरीचे लाकडे कंत्राटदारांनी मिसळवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मूक संमती दिल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. मात्र प्रामाणिकपणे नियमाचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना वनविभागाकडून ठेंगा दाखवला जात आहे.साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक यांनी वारंवार होणाऱ्या वन परिक्षेत्राधिकारी यांच्या बदल्यांचा फायदा घेत नियमबाह्यरित्या जुन्या तारखेत अनेक प्रकरण निकाली काढल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरून कंत्राटदारांना पाठबळ देणाऱ्या साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्याचे वन तथा वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्यांकडे लेखी तक्रारीतून शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)