शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तरुणावर विळ्याने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST

आशिष पटले (३३) रा. देवरी देव असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर गणेश राहगडाले (४५), दिनेश राहगडाले (३२) रा. ...

आशिष पटले (३३) रा. देवरी देव असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर गणेश राहगडाले (४५), दिनेश राहगडाले (३२) रा. देवरी देव आशी आरोपींची नावे आहेत. सिहोरा येथे आठवडी बाजारासाठी देवरी देववरून राजकुमार राणे आणि आशिष पटले आले होते. खरेदी केल्यानंतर सायंकाळी गावी पोहोचले. त्यानंतर आशिष आणि राजकुमार गावातील चौकात थांबले. मोटारसायकलवर बसून असताना गणेश व दिनेशने धारदार विळ्याने हल्ला केला. आशिषच्या शरीरावर विळ्याने अनेक ठिकाणी वार केले. डोक्यावर, मानेवर गंभीर जखमा झाल्या. हाताची बोटे तुटली. मुख्य चौकात प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळताच नागरिक धावून आले. परंतु आरोपी पसार झाले होते. गंभीर जखमी आशिषला विनोद पटले यांचे मदतीने भंडाराच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आशिषची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर पसार झालेल्या दोघांनाही अवघ्या दोन तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ला करण्याच्या एक दिवस आधीच दारूवरून दिनेश व आशिषचे भांडण झाले होते. याच भांडणाचा राग दोन्ही भावंडाचे मनात होता. याच वादातून आशिषवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची माहिती आहे. राजकुमार राणे यांच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी भादंवी ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शहारे तपास करीत आहेत.