शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकट : शेतकरी चिंतातूर

By admin | Updated: March 18, 2015 00:42 IST

जवळपास मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरूवात होते, परंतु सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ही उन्हाळ्याची सुरूवात आहे की, पावसाळ्याची सुरूवात आहे, असा प्रश्न पडत आहे.

दाभा : जवळपास मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरूवात होते, परंतु सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ही उन्हाळ्याची सुरूवात आहे की, पावसाळ्याची सुरूवात आहे, असा प्रश्न पडत आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे जनजीवन बिकट झाले आहे. वर्षभर रात्रंदिवस मेहनत करून, एकवेळ उपासी राहून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे घासच जणू निसर्ग हिसकावून घेत आहे. जिल्ह्यात गहू, चना, लाखोरी, मिरची, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग पोटावर मारतो व राजकीय पुढारी पाठीवर मारतात असे दृश्य आहे.बालपणी वर्गात गुरूजी ‘निसर्ग कोपला तर’ या विषयांवर निबंध लिहून घ्यायचे. ते फक्त शाळा व पेपर पुरली मर्यादित होते. मात्र त्याची प्रत्यक्ष चाहूल सध्या अनुभवायला मिळत आहे. जवळपास आठ ते दहा दिवसापासून निसर्गाची प्रकृती बिघडली असून त्याचा प्राकृतिक परिणाम जनतेवर होत आहे. (वार्ताहर)आरोग्यावर परिणाम वातावरणातील बदलामुळे विषाणुजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सर्दी, पडसे, ताप, पाठदुखी आदी रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी रुग्णालयात गर्दी वाढत आहे. सध्या राज्यात आधीच स्वाईन फ्लू या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या वातावरणाचा मानवी जीवनावर मोठा बिकट परिणाम होत आहे.भाजीपाला महागलानिसर्गाच्या अवकृपेमुळे हाती आलेला भाजीपाला वाया जात आहे. सध्या ग्रामीण भागात मिरची, भेंडीचा तोडा मोठ्या प्रमाणात सुरू असून असेच पाऊस पडत राहिले तर मिरची व भेंडी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशी चिंता शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे. ऐन तोडणीच्या वेळी पावसाने भाजीपाला खराब झाल्याने व बाजारामध्ये भाजीपाला पुरवठा कमी झाल्याने परिणामी भाज्यांचे भाव कडाडले आहेत. दिवसा उन्हाळा सायंकाळी पावसाळा असा चित्र सध्या सुरू असून जणू निसर्गाचा लपंडावच सुरू आहे.मदतीची अपेक्षानिसर्गाच्या अवकाळी पावसामुळे कृषि विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन तोडणीवर आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर दिवसेंदिवस वाढल्याने शेतकरी आत्महत्येचे चित्र सध्या विदर्भात दिसत आहे. सध्या राज्यात व केंद्रात सत्ताधारी एकाच पक्षाचे असल्याने त्यांनी मोठ्या मनाने शेतकऱ्यांचे दु:ख वाटून घेणे गरजेचे आहे. तेव्हाच अच्छे दिन आयेंगे या त्यांच्या ब्रीदवाक्याची सत्यता जनतेला कळून येईल.