शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच भाजीपाला आणि गव्हाचे पिकही घेतले जाते. यंदा प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. या पिकांना आता रासायनिक खतांची गरज आहे. परंतु, किरकोळ विक्रेत्यांकडे रासायनिक खतच उपलब्ध नाही. अनेक शेतकरी किरकोळ विक्रेत्यांकडे जाऊन रासायनिक खतांची मागणी करतात.

ठळक मुद्देदरवाढीचे वेध : किरकोळ विक्रेत्यांना खत देण्यास नकार, रॅक पाॅईंटवर उतरलेले खत गेले कुठे?

मुकेश देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पाण्याची सहज उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. त्यामुळे जिल्ह्यात रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. परंतु, सध्या जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. रासायनिक खतांचा साठा जिल्ह्याच्या रॅक पाॅइंटवर उतरवला खरा; परंतु, अद्यापही किरकोळ विक्रेत्यांना खत देण्यात आले नाही. रासायनिक खतांवर अधिभार लागला असल्याची बतावणी करीत साठेबाजी केली जात आहे. खत कंपन्यांना दरवाढीचे वेध लागल्याचे बोलले जात आहे.भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच भाजीपाला आणि गव्हाचे पिकही घेतले जाते. यंदा प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. या पिकांना आता रासायनिक खतांची गरज आहे. परंतु, किरकोळ विक्रेत्यांकडे रासायनिक खतच उपलब्ध नाही. अनेक शेतकरी किरकोळ विक्रेत्यांकडे जाऊन रासायनिक खतांची मागणी करतात. परंतु, त्यांच्याकडेच साठा नसल्याने ते हतबल झाले आहे.गत आठवड्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी तीन कंपन्यांच्या रासायनिक खताची रॅक आल्याची माहिती आहे. हा सर्व खतसाठा कोणत्याही किरकोळ विक्रेत्याला दिला गेला नाही. त्यामुळे कंपनी व घाऊक विक्रेते साठेबाजी करून दरवाढीची प्रतीक्षा तर करीत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. योग्य वेळी शेतकऱ्यांना रासायनिक खत मिळाले नाही, तर त्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही शेतकरी चढ्या भावात खत खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कृषी आयुक्तालयाकडून गंभीर दखल पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या वतीने जिल्हानिहाय रासायनिक खत    उपलब्धतता आढावा घेण्यात आला. त्यात काही जिल्ह्यांत खत उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी २४ फेब्रुवारी रोजी खत उत्पादक कंपन्यांना ई-मेल पाठविला. त्यात त्यांनी खत पुरवठादार कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात खतसाठा घाऊक विक्रेत्यांच्या गोदामात तसेच खासगी कंपन्यांत साठवणूक केला जात असल्याचे तसेच बहुतांश किरकोळ विक्रेत्यांना खते उपलब्ध करून दिली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. ही बाब गंभीर स्वरूपाची असून शेतकऱ्यांपर्यंत खते न पोहोचल्यास केंद्रीय खत अनुदान थांबविण्याचे निर्देशही दिले. 

कृषी अधिकाऱ्यांना दिले निर्देश साठेबाजीला आळा बसावा व किरकोळ विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना मुबलक साठा उपलब्ध व्हावा यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने सर्व कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश एका पत्रातून दिले आहेत. आता याची कितपत अंमलबाजवणी होते याकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील किरकोळ रासायनिक खत विक्रेते आणि शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांना सध्या रासायनिक खतांची निकड आहे. परंतु खत मिळत नसल्याने अनेक शेतकरी भटकंती करीत आहेत. दुसरीकडे किरकोळ विक्रेतेही त्रस्त झाले आहेत.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र