शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्टॅम्पपेपरचा कृत्रिम तुटवडा

By admin | Updated: July 8, 2016 00:33 IST

येथील तहसील कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

भंडारा : येथील तहसील कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.तहसील कार्यालय परिसरात बोटावर मोजण्याइतके परवानाधारक स्टॅम्प वेंडर आहेत. १००, ५०० व १००० अशा किमतीचे लाखो रुपयांच्या स्टॅम्पची कोषागार कार्यालयातून दर महिन्याला उचल करीत असतात. तहसील कार्यालय व परिसरातील स्टॅम्प व्हेंडरांजवळ नेहमीच गर्दी असते. आता सर्वच कामांसाठी १०० रुपयांचे स्टॅम्प घ्यावे लागत असल्याने या स्टॅम्पना मागणीही मोठी असते. मात्र, दोन-तीन स्टॅम्प व्हेंडर वगळले तर इतर स्टँप नसल्याचे सांगतात. गुरुवारीही ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यामुळे अनेकांना कामासाठी स्टॅम्पची प्रतीक्षा करावी लागत होती. अधिकाऱ्यांकडून स्टॅम्प व्हेंडरच्या मागणीनुसार स्टँपचा पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने हा तुटवडा नेमका कसा होतो? की तुटवडा कृत्रिम आहे, याबाबत उलट-सुलट चर्चा आहे. स्टॅम्प नसल्याचे सांगणाऱ्या व्हेंडरांकडे चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे.यापुर्वी या ठिकाणी १०० रुपयांच्या स्टॅम्पसाठी अनेकदा ११० रुपये मोजावे लागतात. अशाप्रकारे तहसील कार्यालयातील स्टॅम्प वेंडरकडून नागरिकांची लूट सुरू आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातून दररोज कित्येक नागरिक तहसील कार्यालयामध्ये येत असतात. त्यांना विविध कामांसाठी वेगवेगळ्या मूल्यांच्या स्टॅम्प पेपरची गरज भासत असते. येथील व्हेंडरांजवळ स्टॅम्पचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेकांना स्टॅम्पसाठी रांगेत राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. (नगर प्रतिनिधी़)