शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

By admin | Updated: January 19, 2017 00:26 IST

कडाक्याची थंडी सुरु असल्यामुळे थंडीच्या प्रदेशातून हिवाळ्याच्या दिवसात विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणावर स्थलांतरीत पक्षी पाहुणे म्हणून आले आहेत.

पर्यटकांची रेलचेल : उद्योग निर्माण झाल्यास रोजगारालाही वावपवनी : कडाक्याची थंडी सुरु असल्यामुळे थंडीच्या प्रदेशातून हिवाळ्याच्या दिवसात विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणावर स्थलांतरीत पक्षी पाहुणे म्हणून आले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसोबतच पक्षी मित्राणाही एक पर्वणीच ठरली आहे.विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण तयार होवून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होवून जिकडे तिकडे चारही बाजूने अथांग पाणी पसरले आहे. त्यामुळे येथे पक्षांना वास्तव्य करणे सोईचे ठरले आहे. येथे पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात आपली घरटी बांधली आहेत. तीन वर्षापासून येथे थंड प्रदेश सायबेरीया, मंगोलिया, लडाख, चिन, तायवान आदी देशातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येत आहेत. मागील वर्षी येथे हिवाळ्यात स्पाूट बिल्ड डक या स्थलांतरित पक्षाच्या थव्यासोबतच बहुसंख्य स्थलांतरित पक्षी येथे आढळून आले होते. कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येथे आले आहेत.हे पक्षी गोसीखुर्द धरणाच्या खालच्या निथड भागात घाटउमरीच्या व थुटानबोरीच्या बाजूने असलेल्या धरणाच्या पाण्यात जलविहार करताना आढळून आले आहे. स्पॉट बिल्ड डक या स्थलांतरित पक्षांचे थवे यावर्षीही आले आहेत. गोसीखुर्द धरण विदर्भातील चांगले पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात येणारे स्थलांरित पक्षी वाटल्यास गोसीखुर्द धरण पक्षी मित्रांसाठी अभ्यासाचे ठिकाण ठरणार आहे. पण त्याकरिता या पक्ष्यांच्या शिकारीवर कडक निर्बध आणून या पक्ष्यांना वाचविणे महत्वाचे आहे. त्यामुळे या पक्षांना स्वच्छ जलविहार करता येईल. त्यामुळे पुढच्या वर्षी येणाऱ्या स्थलांतरित पक्षांच्या संख्येत वाढ होईल.धरणाच्या खालच्या निथड भागात मासेमारी केली जात असल्यामुळे या स्थलांतरित पक्षांना जलविहार करताना अडथळे येत आहेत. अनेक वेळा या पक्षांचे पाय जाळ्यात अडकल्याचे आढळून आले आहे. गोसीखुर्द धरणासोबतच वाही जलाशय, वैनगंगा नदी आदी ठिकाणीही स्थलांतरित पक्षी आले आहेत. (शहर प्रतिनिधी)