शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना अटक व सुटका

By admin | Updated: April 24, 2016 00:40 IST

गोसीखुर्द धरण, वसाहत, कालवा व पुनर्वसीत गावठानासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमीनी दिल्या त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप रेंगाळलेला आहे.

कब्जा आंदोलन : भूमिपूजन स्थळी पेटविल्या मेणबत्त्यापवनी : गोसीखुर्द धरण, वसाहत, कालवा व पुनर्वसीत गावठानासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमीनी दिल्या त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप रेंगाळलेला आहे. त्यांच्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी गुरूवारला कब्जा आंदोलन केले. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने सिव्हील कॉलनी, गोसीखुर्द वसाहतीवर ‘कब्जा आंदोलन केले’ या आंदोलनात सहभागी प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी अटक केली व नंतर सोडून दिले. दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी गोसीखुर्द धरणाचे भुमिपूजन झालेल्या राजीव गांधी टेकडीवर सायंकाळी मेणबत्ती पेटवून भूमिपूजनाला २९ व्या वर्षी सुरवात झाल्याच्या स्मृतींना उजाळा दिला.दुपारी २ वाजतेपासूनच गोसीखुर्द गावी गोसीखुर्द, गोसे बुज, मेंढा, पाथरी, जामगाव, चिचखेडा, नवेगाव, खापरी (सौंदड), खापरी (रेहपाडे), चिचाळ आदी गावातील प्रकल्पग्रस्त जमा झाले. यानंतर हे प्रकल्पग्रस्त गोसीखुर्द प्रकल्पाकडे निघाले. शेकडोंच्या संख्येतील महिला व पुरूष प्रकलग्रस्तांनी घोषणा देवून परिसर दणानून सोडला. वसाहतीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी त्यांना अडवील्यामुळे प्रकल्पग्रस्त तिथेच रस्त्यावर धरणे अांदोलनावर बसले.सायंकाळी या प्रकल्पग्रस्तांनी गोसीखुर्द धरणाच्या भुमिपूजन स्थळी मेणबत्या पेटवून भुमिपूजन समारंभाला उजाळा दिला. यानंतर प्रकल्पग्रस्तांनी पवनीचे नायब तहसीलदार कांबळे, धरण विभागाचे अभियंता चवरे, पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात विलास भोंगाडे, वामन भोयर, दादा आगरे, समिक्षा गणविर, गुलाब मेश्राम, भिमराव भिमटे, रमेश भेंडारकर, राजानंद वानखेडे, राजू मेश्राम, झिबल गणवीर, कुसुम कठाणे, सुनिता मेश्राम, गंगाधर हत्तीमारे, प्यारे मेश्राम, सोमेश्वर भुरे, धर्मराज भुरे, पुरुषोत्तम मेश्राम, गुलाब उके यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)