शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

३ कोटींच्या पेयजल योजनेला मंजुरी

By admin | Updated: April 14, 2017 00:31 IST

राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा नुसार जिल्ह्यातील चार गावात पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात येणार आहे.

जि.प. जलव्यवस्थापन समितीचा ठराव : तुमसर तालुक्यात तीन तर पवनीत एका ठिकाणी होणार बांधकामभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा नुसार जिल्ह्यातील चार गावात पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी १२ लाख ८८६ रुपयांच्या योजनेला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीने मंजुरी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या सभाध्यक्षतेखाली पार पडलेल्या गुरुवारच्या सभेत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती विनायक टेकाम, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले यांच्यासह सर्व समिती सदस्य व लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रीय ग्रामीण कृती आराखडा पेयजल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या गावांमध्ये पवनी तालुक्यातील अड्याळ, तुमसर तालुक्यातील चुल्हाड, देव्हाडी व पाथरी या गावांचा समावेश आहे. अड्याळ येथे या योजनेसाठी ६८ लाख ६ हजार ४०२ रुपये, चुल्हाडसाठी १ कोटी ८ लाख ३४ हजार ८२ रुपये, देव्हाडीसाठी ७१ लाख १ हजार २०१ रुपये व पाथरीसाठी ५३ लाख ७९ हजार २०१ रुपये असा तीन कोटी १२ लाख ८८६ रुपयांचा हा आराखडा मंजूर केला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणीपुरवठा समितीच्या नियंत्रणात यांचे काम व नियंत्रण करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी निर्णयाने अड्याळ, चुल्हाड, देव्हाडी व पाथरी येथील पाण्याच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याचा जि.प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी सुवर्णमध्य साधला आहे. (शहर प्रतिनिधी)