शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अन् गुराख्याने काठीच्या सहाय्याने पळवून लावला वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 18:42 IST

Nagpur News जनावरे घेऊन चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने अकस्मात हल्ला केला. यात गुराख्याने प्रसंगावधान दाखवित काठीच्या सहाय्याने वाघाला पळवून लावले.

भंडारा : जनावरे घेऊन चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने अकस्मात हल्ला केला. यात गुराख्याने प्रसंगावधान दाखवित काठीच्या सहाय्याने वाघाला पळवून लावले. ही घटना नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या आसलपानी येथे सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यात मात्र दिलीप चव्हाण (५२) हे जखमी झाले.

मोहाडी तालुक्यानंतर तुमसर तालुक्यात वाघाने धुमाकुळ घातला आहे. विशेष करुन नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आसलपानी गावात वाघाचे दर्शन होत असते. जंगलामध्ये नेहमीप्रमाणे गुराखी दिलीप चव्हाण हे जनावरे घेऊन चराईसाठी गेले होते. याचवेळी दबा धरुन बसलेले पट्टेदार वाघाने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांच्या गळ्यावर वाघाच्या पंजाचे व्रण उमटले. मात्र प्रसंगावधान दाखवित चव्हाण यांनी हातातील काठीचा दम वाघाला भरला. थोड्यावेळासाठी दिलेरी दाखविल्याने वाघाने तिथून पळ काढला. घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. चव्हाण यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली होती.

सध्या शेतशिवारात धानपिक लावले आहे. शेतकरी रात्री बेरात्री शेतात जात असतात. परंतु वाघाचा गावसीमेवर शिरकाव होत असल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. गत काही महिन्यांपासून तुमसर व मोहाडी तालुक्यात वाघाच्या हालचाली वाढल्या आहेत.नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाचा संचार आहे. परिणामी या जंगल परिसरात गुराख्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु या सुचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटना घडत आहेत.-मनोज मोहिते, वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी

टॅग्स :Tigerवाघ