शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अन् ग्रामसभेचा ठराव झाला बेपत्ता

By admin | Updated: September 6, 2014 23:32 IST

मानेगाव बोरगाव येथील रोजगार सेवकाच्या मनमानी कारभाराने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत त्याला बदलण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र हा ठराव बेपत्ता झाल्याची तक्रार आहे. याबाबत कारवाई करण्यास

बारव्हा : मानेगाव बोरगाव येथील रोजगार सेवकाच्या मनमानी कारभाराने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत त्याला बदलण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र हा ठराव बेपत्ता झाल्याची तक्रार आहे. याबाबत कारवाई करण्यास संबंधित अधिकारी विलंब करीत असल्याने गावकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मानेगाव बोरगाव गटग्रामपंचायत असून ग्रामसेवक चुटे हे कार्यभार सांभाळत आहेत. दि.१५ आॅगस्टला दोन्ही गावामध्ये झालेल्या ग्रामसभेपैकी मानेगाव येथे सचिवाचे काम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सय्याम यांनी पाहिले. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली. वादग्रस्त रोजगार सेवक यांच्या बदली संदर्भाने ठराव घेण्यात आला. गावकऱ्यांनी याबाबत ठराव घेवून ग्रामरोजगार सेवकाला कामावरून कमी करण्याचा ठराव घेतला. ग्रामसभेचा समारोप झाल्यानंतर ठरावावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. नंतर ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाला ठराव सोपविण्यात आला. सरपंच सविता भेंडारकर यांना विचारणा केली असता त्यांनी मी ग्रामपंचायतीत ठराव वाचला होता मात्र दुसऱ्या दिवशी तो कागद गहाळ झाला. त्यामुळे ठराव अंदाजाने मुख्य ठराव पुस्तिकेत लिहण्यात आला. मात्र त्यात ग्रामरोजगार सेवकाच्या बदली संदर्भातील मुद्यांचा समावेश नाही, असे त्यांनी सांगितले.परंतु, ग्रामसभेत सचिव सयाम यांनी लिहलेला ठरावाचा कागद गहाळ झाला कसा, असा प्रश्न आहे. हा प्रकार हेतुपुरस्परपणे केल्याचा अध्यक्ष रंगारी व स्थानिक ग्रामस्थांचा आरोप असला तरी त्याच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. पंचायत समितीच्या संबंधित विभागाने सचिव व ग्रामरोजगार सेवक यांची चौकशी करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)