शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अन् शेतकऱ्यांनीच जाळले धानपीक

By admin | Updated: December 3, 2015 00:44 IST

आधीच कोरडा दुष्काळ त्यातही शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड केली. परंतु परिसरातील तळे व विहिरी कोरडे पडल्याने सिंचनाअभावी व हवामानाच्या बदलामुळे ...

तुमसर : आधीच कोरडा दुष्काळ त्यातही शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड केली. परंतु परिसरातील तळे व विहिरी कोरडे पडल्याने सिंचनाअभावी व हवामानाच्या बदलामुळे शेतपिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला. परिणामी धानाची उतारी मिळाली नाही. स्वत:च्या शेतातल्या उभ्या धानपिकाला जाळून परिसरातील १८ गावे ही दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. तुमसर तालुक्यातील चिखला, आष्टी व गर्रा बघेडा जि.प. क्षेत्रात यावर्षी अती अल्प पाऊस पडल्याने परिसरातील शेतकरी प्रभावित झाले होते. सर्वात जास्त कोरड्या दुष्काळाचा फटका चिखला जि.प. क्षेत्रातील चिखला, राजापूर, सीतासावंगी, चिचोली, भोंडकी, मोकोटोला, गुडरी, खंदाळ, सोदेपूर, धामनेवाडा, खैरटोला, गोबरवाही, हेटी, हिरापूर, हमेशा, धुटेरा, घानोड, सक्करदरा, मोहगाव या गावांना बसला. त्यामुळे परिसरातील १५ हजार हेक्टरवरील शेतजमिनीवर शेतकऱ्यांनी शेतीची लागवडच केली नाही. तर कुठे धानावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाला उतारी मिळालीच नाही. शेतातील धान कापणीला येणारा खर्चही त्या धानाच्या उतारीतून होवू शकत नसल्याने चिखला जि.प. क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून तब्बल ३० एकर शेतातील उभ्या धान पिकाला स्वत:च्या हाताने जाळून घेतले व आतातरी क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या हाताला कामे व कर्जमाफी घोषित करण्याची एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्येशी जाणीव व्हावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. मात्र प्रशासनातर्फे कसलीही कारवाई न झाल्याने प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता शेतकऱ्यांनी स्वमर्जीने धानपिक जाळले. तरी देखील शासनाला जाग येत नसेल तर यास काय म्हणावे?- संगीता सोनवानेजि.प. सदस्या, चिखला.