शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

आणि अपंग विद्यार्थीही धावू लागले...

By admin | Updated: December 4, 2015 00:50 IST

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून तुमसर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात एक दिवसीय क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

अपंग दिन : गोळाफेक, दौड स्पर्धा बघून उपस्थित झाले आश्चर्यचकिततुमसर : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून तुमसर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात एक दिवसीय क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अपंग विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. केवळ संधी द्या. संधीचे सोनेच करू, या जिद्दीने स्पर्धेत उतरुन आम्हीही कुठे मागे नाहीत, हे या अपंग विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दिनाचे औचित्य साधून अपंगाच्या कलागुणांना उजाळा मिळावा, याकरिता एक दिवसीय क्रीडा सत्र व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक अपंग प्रशिक्षण केंद्रात करण्यात आले. त्या अपंग विद्यार्थी विद्यार्थ्याकरिता ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर दौड स्पर्धा, वेगात चालण्याची स्पर्धा, दोन्ही पाय चांगले व कमरेवरील भागात अपंग विद्यार्थ्यासाठी घेण्यात आली होती. दोन कुबड्या आणि एक कुबडी असलेल्या विद्यार्थ्यांकरीता धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. याशिवाय व्हिलचेअरवर बसुन गोळाफेक या स्पर्धाही घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन जागतिक अपंग दिनाचे महात्म्य दाखवून दिले. विजेते ठरलेल्या अपंग विद्यार्थिनीना संस्थेच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सायंकाळी अपंग विद्यार्थ्यांच्ळा मनोरंजनाकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे आर. जी. गायकवाड यांच्या मार्गदशात मुख्याध्यापक सुरेश घडले, सुभाष कांबळे, अर्चना काटकर, यशवंत गणवीर, ईश्वर काळसर्फे, रंजना बडवाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. (शहर प्रतिनिधी)